महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती,दि.२०:-श्री विदेही सद्गुरू जगन्नाथ बाबा देवस्थान, घोडपेठ येथील वार्षीक काला महोत्सवाचे औचित्य साधून केंद्रीय मानवाधिकार संगठनचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष डॉ. अंकुश आगलावे यांनी संताचे विचार आत्मसात करण्याची नितांत गरज असल्याचे सांगितले.सदर वार्षीक काला महोत्सव दि. 16 डिसेंबर ला जगन्नाथ बाबा देवस्थान, घोडपेठ येथे साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष पुर्व केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज भैय्या अहीर होते. अहीर यांनी महाराष्ट्र ही संताची भुमी आहे, संताचे कार्य हे मोलाचे असल्याचे सांगितले.महाराष्ट्रामध्ये हजाराचे वर जगन्नाथ महाराजांची मुर्ती आहेत. घोडपेठ गावांतील नागरिकांच्या सहकार्याने व पुढाकाराने जगन्नाथ महाराजांच्या मुर्तीची स्थापना करण्यात आली. यावेळी काला महोत्सवाला चार हजारांच्या वर भावीकांची उपस्थित होते. यावेळी पालखी, दिंडीची पुजा, व आरती हंसराज अहीर यांचे हस्ते करण्यात आली. तसेच मंदीराला देणगी व जागा उपलब्ध करून देण्या-यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला. वार्षीक काला महोत्सवाला यशवंत वाघ, आकाश वानखेडे, सत्यपाल दुधे, वेलुरकर गुरूजी, रवी माणुसमारे, अनिल खडके, अनिल फुलझेले , बहुसंख्य घोडपेठवासीय यावेळी उपस्थित होते.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)