सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली.
गडचिरोली : महाकवी कालिदासाचं मेघदूत हा खऱ्या अर्थाने भारतीय साहित्य आणि समाजामधला ज्ञात पहिला पोस्टमनचा अवतार मानायला हवा प्राचीन काळी पत्रव्यवहाराची एक वेगळीच संकल्पना होती.भारतात त्या काळी इंग्रजाबरोबर डच,पोर्तुगीज,फ्रेंच,डॅनिश वसाहती होत्या.त्यांच्या वेगवेगळ्या पोस्टल सेवा होत्या.इंग्रजांच्या आधिपत्याखाली ईस्ट इंडिया कंपनीने मुबंई, चेन्नई आणि कोलकाता येथे 1764 ते 1766 च्या दरम्यान ही पोस्टाची सेवा उपलब्ध करून दिली. पण तत्कालीन गव्हर्नर जनरल वारन हेस्टींगने खऱ्या अर्थाने लोकांसाठी ती मोकळी केली 1774 मध्ये कोलकात्यात.पोस्ट खात्याने वेग पकडलं तेव्हा भारतामध्ये रेल्वेचा उदय झाला.खऱ्या अर्थाने भारताचा पहिल्या1857च्या स्वातंत्र्यलढ्याचे दोन शत्रू ठरले भारतीय रेल आणि पोस्ट खाता हा झालं इतिहास.पण आजच्या इमेल आणि माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये भारतीय पोस्ट खात्याचं काय महत्व आहे आणि त्याचा वापर किती लोक करतात हा कुतूहलाचा विषय आहे.आज भारतीय पोस्ट खात्याने आजच्या घडीला ई-पोस्ट,इ-बिल पोस्ट,स्पीड पोस्ट,बिझनेस पोस्ट,लॉजस्टिक पोस्ट,एक्सप्रेस पोस्टल सर्व्हिस,मीडिया पोस्टल,रिटेल पोस्ट,ग्रीटिंग पोस्ट,स्पीड नेट,आयपीपीबी,सीएससी सेवा असे अनेक सेवा भरतीय पोस्ट चालवत आहे.भारतीय टपाल खात्यांचा सगळ्यात जुनं आणि खेडोपाडी पोहचलेला काम म्हणजे त्यांच्या आर्थिक सेवाचं आहे.यामध्ये सगळ्यांचा परिचयाची सेवा म्हणजे मनिऑर्डर होय.भारतीय पोस्ट खात्याने या इंटरनेट जगात कितीही बाजी मारली तर पोस्ट खात्यांचे अनेक कामे बस सेवेने होत आहेत. यामध्ये प्रामुख्याने ग्रामीण भागात इंटरनेट सेवा उपलब्ध नसल्याने पोस्ट खात्याने आजही बस सेवेच्या मदतीने पार्सल,पत्र,मुलाखती पत्रे आणि इतर महत्वाचे दस्तऐवज आजही बसने ग्रामीण भागात पोहचवून पोस्टमनचा मदतीने ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत पोहचून सेवा देत आहे.आजही अनेक ग्रामीण भागात नागरिकांना मनिऑर्डर ते महत्वाचे पत्रव्यवहार पोस्ट खात्याने बसनेच करत आहे.आणि ग्रामीण भागात इंटरनेट सेवा उपलब्ध नसल्याने नौकरीचे मुलाखतीचे पत्र व्यवहार सुध्दा याच बसने नेत असते.गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने महामंडळाचे चालक व वाहक आणि इतर कर्मचारी संप पुकारल्याने राज्यातील बस सेवा पूर्णपणे बंद झाले असून यांच्या ग्रामीण भागातील सामान्य नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांना सुध्दा फटका बसत आहे.बस सेवा बंद झाल्याने ग्रामीण भागातील नागरिकांचा गरीब रथ म्हणून ओळख असलेल्या लाल परी दुर्लभ झाली असून याच लाल परीने पोस्टाचे पार्सल सेवा सुरू होते.मात्र गेल्या अनेक दिवसांपासून बस सेवा बंद असल्याने जिल्ह्यातील ग्रामीण भागातील टपाल सेवा ठप्प झाली आहे.जुन्या काळात पोस्टमन आपल्या घरासमोर येऊन पोस्ट म्हणून हाक मारले तर घरातील वातावरण काही खुशी काही गम अशी परिस्थिती निर्माण होत होते.पोस्टमन पत्र देऊन गेल्यावर घरातील सदस्य एका ठिकाणी बसून पत्र वाचन करत होते.मात्र आज या इंटरनेटच्या युगात मोबाईल वापरामुळे नागरिक एकमेकांपासून दूर होत असल्याची चित्र दिसत आहे.पोस्ट सेवा असताना ग्रामीण भागातील शेकडो नागरिक पोस्टातून आलेल्या पत्रातूनच नोकरीला जाऊन मुलाखती देऊन नोकरीवर लागत होते.आज देश इंटरनेटच्या माध्यमाने कितीही आविष्कार केल्या तरी आजही ग्रामीण भागातील जीवनमान पारंपरिक पद्धतीने जगत असून ग्रामीण भागात आजही बस सेवेनच टपाल सेवा पुरविले जात असून ग्रामीण भागातील सामान्य जनतेच्या दुवा भारतीय टपाल सेवा आहे.


