शरद वालसिंगे ,ग्रामीण प्रतिनिधी
अकोट : थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त पत्रकार संघटनेच्या कार्यालयात छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे हारार्पण व पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष म.रा.ग्रामीण पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अहेमद शेख होते. तर प्रमुख अतीथी माजी जिल्हाध्यक्ष गोपाल नारे,जिला उपाध्यक्ष कमलेश राठी ,निरंजन गावंडे यांची होती . अध्यक्षीय भाषणात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकण्यात आला .तसेच इतरही मान्यवरांनी महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी निमीत्त आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका उपाध्यक्ष गणेश वाकोडे यांनी सुत्रसंचालन वीरेन शहा यांनी केले .या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघटनेचे अकोट तालुका कार्याध्यक्ष अरुण काकड सचिव पवन बेलसरे, सहसचिव देवानंद आग्रे, उपाध्यक्ष निलेश झाडे माजी उपसभापती ,तसेच पत्रकार संघटनेचे सदस्य तथा मंचनपुर चे माजी सरपंच शैलेश धांडे , चंडिकापूर चे उपसरपंच तुषार अढाऊ, कार्यालय प्रतिनिधी काशिनाथ कोंडे, जेष्ठ पत्रकार मार्गदर्शक गोवर्धन चव्हाण, सय्यद नूर ,श्रीराम ढोकणे उपाध्यक्ष राजेश साविकार ,नरेंद्र कोंडे, दत्ता भगत, शरद वालशिंगे,प्रमोद सावरकर, प्रमोद ढोकणे,पुरुषोत्तम निमकर्डे ,राजकुमार मुंडले, गणेश बुटे, राजकुमार बुटे,स्वप्नील ईंगळे ,विशाल कुलट, संजय चेडे,बाळकृष्ण तळी, आकाश धुमाले,विशाल कुलट ,संतोष विणके, जेष्ठ पत्रकार श्रीकृष्ण जांभळे ,गणपत केदार, राहुल भेले ,जगदीश जेस्वानी, इत्यादी सन्माननीय पत्रकार उपस्थित होते ,कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पत्रकार नरेंद्र कोंडे यांनी केले.