अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला
पातूर : श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती चे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली श्री.शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती द्वारा संचालित डॅा.एच. एन.सिन्हा कला व वाणिज्य महाविद्यालय, पातुर आणि यशवंत ग्रामीण शिक्षण संस्था, वर्धा द्वारा संचालित यशवंत महाविद्यालय सेलु जि वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिनानिमित्त ‘भारतीय संविधान आणि लोकशाहीची वाटचाल’ या विषयावर सोमवार दि २९ नोव्हेंबर २१ रोजी एक दिवसीय ॲानलाईन राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. एक दिवसीय ॲानलाईन राष्ट्रीय सत्राचे उद्घाटन श्री.शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीपबाबू इंगोले यांच्या हस्ते होणार आहे.उद्घाटकीय सत्राचे अध्यक्षस्थान यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष समीर देशमुख भूषविणार आहेत. पहिल्या सत्राचा विषय ‘भारतीय संविधानातून आविष्कृत लोकशाहीचे प्रारूप’ या सत्राचे अध्यक्षीय स्थान डॅा शुची गुप्ता, विभाग प्रमुख, एस. एन.कॅालेज खंडवा, एम पी. तर प्रमुख मार्गदर्शक डॅा संदीप तुंडुरवार, उप-प्राचार्य बिंझाणी सिटी कॅालेज नागपुर मार्गदर्शन करणार आहेत. समारोपीय सत्राच्या अध्यक्षस्थान श्री.शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. गजाननराव पुंडकर भूषविणार आहेत.तसेचं प्रमुख अतिथी म्हनुन डॅा. वर्षा देशमुख प्राचार्य डॅा. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालय, अमरावती यांची उपस्थीती असणार आहेत.या चर्चासाठी सर्व अभ्यासक, संशोधक व शिक्षकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन ॲानलाईन चर्चासत्राचे आयोजक प्रभारी प्राचार्य डॅा. के. एस. खंडारे व प्रभारी प्राचार्य डॅा.अर्चना डहाणे तसेचं चर्चासत्राचे सचिव डॅा. दिपाली घोगरे व डॅा.संदीप काळे यांनी केले आहे.


