सलीम शेख
तालुका प्रतिनिधि एटापल्ली
एटापल्ली पंचायत समिती अंतर्गत येत असलेले गुरुपल्ली ग्रामपंचायत येथे भोंगाळ कारभार सुरू असल्याचे दृश्य सामोर आले आहे.ग्रा.पं. गुरूपल्ली येथे कार्यरत असलेले ग्रामसेविका एम.ए.धुर्वे हे नेहमी गैरहाजर राहुन शासनाला व ग्रामस्थांना अंधारात ठेवण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे.सतत गैरहजार असल्याने ग्रामस्थांना कामा करीत चकरा मारावा लागत आहे,ग्रामसेवकांना मुख्यालय राहून सेवा दयावी लागते परंतु येथील ग्रामसेविका अहेरी येथे निवासस्थानी राहून हाफत्यातून फक्त दोन ते तीन दिवस कार्यलायत देवाला दर्शन दिल्या सारखे २ वाजता येतात व ४ वाजता निघून जातात कारण विचारल्यास बस सुटली किंवा बस भेटत नाही घरी जायला असा सदा उत्तर देऊन निघून जातात व काही काम असल्यास त्यांना संपर्क साधायचा पर्यंत केल्यास मोबाईल बंद करून उत्तर देत नाही अशीसर्व पुरेशी माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.यांच्या या निष्काळजीपणा मुळे शिक्षण,शेती,व्यवसाय व अन्य कामा करीत येत असलेल्या ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे,ग्रामपंचायत येथे कार्यरत असलेल्या कर्मचार्यांची ११ महिन्या पासुन पूर्ण वेळ हजर राहून सुद्धा वेतन मिळाली नाही त्यामुळे त्यांच्या परिवारावर उपासमारीची वेळ व दिवाळी दसरा अंधारात गेली आहे व ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेले सार्वजनिक शौचालय बांधकाम करती असलेल्या कामगारांचे पेमेंट सुद्धा देण्यात आले आहे,ही सर्व बाब शिवसेना तालुकाप्रमुख मनीष दुर्गे यांच्या लक्षात येताच त्यानी लोकांची समस्या मार्गी लावण्यासाठी संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिति कार्यालय एटापल्ली यांना निवेदन देण्यात आले, मनीष दुर्गे यांनी नागरिकांशी चर्चा करून स्थानिक लोकांच्या वेदना जाणून घेतल्या व त्यांच्या सर्व समस्याना तात्काळ मार्गी लावून अश्या या भोंगाळ कारभार करण्याऱ्या धुर्वे ग्रामसेविका तात्काळ निलंबित करून नागरिकांना न्याय देण्यात यावी अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे,निवेदन देतांना शिवसेना तालुका प्रमुख मनीष दुर्गे,उपतालुका प्रमुख दल्लू पुसाली,तालुका समन्वयक दीपक दत्ता,शाखा प्रमुख अक्षय पुंगाटी,शाखाप्रमुख सुमित खन्ना,शाखा प्रमुख निहाल कुंभारे ,सुजल वाघमारे व सर्व शिवसैनिक उपस्थित होते.


