गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा तालुक्यातील गाडेगाव येथील सरपंच प्रमोद वाकोडे यांनी दि. ९ नोव्हेंबर पासुन तेल्हारा गाडेगाव रस्त्यासबंधीत उपोषण सुरू केले होते. तालुक्यातील वेगवेगळ्या संघटना, पक्ष, महीला बचतगट आणि लोकांनी या उपोषणाला पाठिंबा जाहीर केला होता त्यामुळे या उपोषणाने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधले होते.
गाडेगाव सरपंचांच्या उपोषणाला पाठिंबा बघता मुख्यमंत्री सडक योजनेचे अभियंता श्री. व्हि. आपोतीकर यांनी शुक्रवारी दुपारी उपोषण स्थळी भेट दिली आणि चार दिवसांपासून सुरु असलेल्या उपोषणाची येत्या २० तारखेला रस्त्याचे काम सुरू करण्यात येणार अशा ठोस आश्वासनानंतर सांगता केली. दिड दोन वर्षांपासून रखडलेल्या रस्त्याचे काम पुन्हा सुरु होणार असे ठाम आश्वासन जरी अभियंत्यांनी दिले असले तरी जनमानसात संबंधित जबाबदार अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यावर कवडीचाही विश्वास दिसून आला नाही. कारण तेल्हारा तालुक्यातील रस्यांबाबत आतापर्यंत काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी घेतली उपोषणकर्त्यांची भेट तेल्हारा तालुक्यातील गाडेगाव येथील सरपंच प्रमोद वाकोडे यांनी सुरू केलेल्या उपोषणाचा शुक्रवारी चौथा दिवस होता. ही बाब अकोला जिल्ह्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर यांनी तातडीने भेट घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केली. आणि योगायोग चौथ्या दिवशीच येत्या २० तारखेपासून रस्त्यावर कामाला सुरुवात होईल या आश्वासननंतर सरपंच प्रमोद वाकोडे यांनी उपोषण मागे घेतले. काँग्रेस जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर यांनी उपोषणकर्ते प्रमोद वाकोडे यांच्या भेटीवेळी उपोषण स्थळी डॉ. संजिवनी बिहाडे महीला उपाध्यक्षा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी डॉ. अशोक बिहाडे, प्रकाश वाकोडे काँग्रेस तालुकाध्यक्ष तेल्हारा, ओमप्रकाश शर्मा, प्रशांत देशमुख, अतुल ढोले, परमेश्वर इंगळे, मनोहर बाजोड, सुभाष बाजोड, ज्ञानेश्वर नागोलकार, नितीन वाकोडे, निऋत्ती वाकोडे, रविंद्र विरघट, उमाळे, भाष्कर उजाड, बंडुभाऊ साबळे, गजानन कोकाटे, विजु फुंडकर, सुधाकर उजाड, संजय साबळे, उमेश वाकोडे, शुभम वाकोडे आणि शुभम साहेबराव वानखडे यांची उपस्थिती होती.


