सचिन संघई जिल्हा प्रतिनिधी वाशिम
वाशिम:-वाशिम जिल्ह्यातील हराळ हे एक छोटेसे गाव असून सर्व गुण संपन्न गाव म्हणून सर्व जिल्ह्यात ओळख आहे हराळ येथील सर्व शासकीय कार्यालय हे सुसज्ज बांधकाम व कार्यालयात स्वच्छता आढळून येते याच अनुषंगाने हराळ च्या सरपंच सौ आशाबाई विष्णू सरकटे यांनी जिल्हा स्वच्छता विभागाशी संपर्क साधून स्वच्छ कार्यालय या योजनेत भाग घेतला त्या अनुषंगाने जिल्हा परिषद स्वच्छता विभागाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत हराळला दोन वेळा भेट दिली आणि त्यांनी येथील कार्यालयची स्वच्छता पाहून तसा अहवाल त्यांचे वरिष्ठ अधिकारी यांना दिला या गावाला आजादी का अमृत महोत्सव अभियानाअंतर्गत स्वच्छ कार्यालय 2021 ग्रामपंचायत स्तर द्वितीय पुरस्कार जिल्हा परिषद वाशिम चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील निकम व त्यांची टीम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला याप्रसंगी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामविकास अधिकारी उपस्थित होते


