गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा:-मा.केंद्रीय राज्यमंत्री खासदार श्री संजय धोत्रे यांचे संकल्पनेतून तसेच भाजप जिल्हाध्यक्ष आ रणधीर सावरकर,मा.आ. प्रकाश भारसाकळे यांचे मार्गदर्शनाखाली तेल्हारा नगर परिषद येथे केंद्रीय रक्षा मंत्रालय दिल्ली मार्फत आज रणगाडे प्राप्त झाले.सदर रणगाडे हे T 55 हे असून या रणगाड्याचा वापर 1965 साली झालेल्या भारत पाकिस्तान च्या युद्धात केला गेला आहे.अकोला जिल्ह्यात प्रथमच तेल्हारा शहरात हे रणगाडे प्राप्त झाल्यामुळे नागरिकांमध्ये चर्चेचा विषय झाला आहेआजचे दिवशी हे रणगाडे तेल्हारा शहरात दाखल झाले असता तेल्हारा नगरीच्या नगराध्यक्षा सौ जयश्री पुंडकर,महिला व बालकल्याण सभापती आरती गायकवाड ,भाजप गटनेते नरेशआप्पा गंभीरे,बांधकाम सभापती मंगेशसोळंके,नगरसेवक सुनील राठोड ,अनुप मार्के,भाजप तालुका अध्यक्ष गजानन उंबरकार , संदीप खारोडे,शहर सरचिटणीस गजानन गायकवाड,रवी गाडोदिया ,युवा मोर्चा जिल्हा सचिव सुमीतआप्पा गंभीरे,शहर अध्यक्ष गणेश इंगोले यांनी तेल्हारा शहराचे सीमेवर पूजन केले. त्यानंतर रणगाडे तेल्हारा शहरात पोहोचले असता नागरिकांचा व आजी माजी सैनिकांचा उत्साह शिगेला पोहोचला.आजी माजी सैनिक बांधवतेल्हारा तालुका सैनिक संघटना राम पाऊलझगडे( अध्यक्ष)सुरेश जवकार साहेब,बोदडे साहेब,सुमेध गायगोड ,रोठे साहेब,दिनेश माकोडे,टोलमारे साहेब,पांडुरंग खुमकर ,रामेश्वर घंगाळ ,पंकज कागटे ,सागर निर्मळ,अशोक मानकर,श्रीकांत ताथोड,विशाल जवंजाळ,खारोडे साहेब,अरुण हिवराळे साहेब,शिवा सरोदे,स्वप्निल गायगोळ.आपल्या गणवेशात उपस्थित होते,तसेच शहरातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने ढोल ताशे व फटाक्यांच्याअतिषबाजीने रणगाड्याचे स्वागत केले या रनगाड्याच्या स्वागत शोभायात्रे करीता एकता मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अथक परीश्रम घेतले हे रणगाडे प्रभाग क्र 8 मधील जिजाऊ उद्यान येथे ठेवण्यात येणार असून त्यानंतर तिथे सुशोभीकरण करण्यात येणार आहे…

