किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातूर शहरातील धार्मिक स्थळांचे नुतनीकरणाला
पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर
मतदार संघात विकासाचे धोरण ठेवून कामे मार्गी लावू
मा.आ नितीन देशमुख
पातूर शहरातील छत्रपती संभाजी या मुख्य चौकातील महात्मा ज्योतीबा फुले स्मारक,पातुर तालुक्याचे आराध्यदैवत संत श्री सिदाजी महाराज संस्थानचा भव्य सभामंडप व सिमा भिंत,अती पुरातन असलेल्या शहाबाबू दर्गाह सुंदरीकरण करून 2 कोटी निधीच्या माध्यमातून भव्य अशी सिमा भिंत उभारणे,पातुर शहरातील इतिहासकालीन स्वयंभू खडकेश्र्वर मंदिर परिसराचे 1 कोटी 25 लाखाचा निधी उपलब्ध करून विविध विकास कामे करून जीर्णोद्धार होणार आहे तर तसेच पाटील मंडळी येथील सामाजिक सभागृह करिता 25 लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे पातुर तालुका चे आराध्य दैवत श्री संत सिदाजी महाराज परिसरातील मुख्य सभामंडपाकरीता 1.25 एक कोटी पंचवीस लाख रुपये निधी उपलब्ध झाला आहे असे एकंदरीत कामांचा लेखाजोखा घेऊन पाच कोटी निधी ची तरतूद आमदार नितीन देशमुख यांच्या प्रयत्नातून झाली आहे पातुर शहरा करिता एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करणारे हे पहिलेच आमदार असल्याची चर्चा संपूर्ण नागरिकांमध्ये होत आहे.सोशल मिडीयात त्यांनी आता खासदार म्हणून तालुक्याला नव्हे तर जिल्ह्याला विकासाची गती द्यावी अशी चर्चा आहे.त्यांच्यावर एके काळी टिकेची झोळ उठवणारे आज त्यांचे कार्य बघून प्रशंसा करतांनाचे चित्र पातुर शहरात निर्माण झाले आहे.या निधीचे खऱ्या अर्थाने आमदार नितीन देशमुख पातूर पंचायत समिती गटनेते अजय ढोणे, नगरपरिषद विरोधी पक्ष गटनेता हिदायत खां रूम खां,माजी नगरसेवक परशराम उंबरकार, माजी नगरसेवक डॉ.डिगांबर खुरसडे,माजी नगरसेवक गजानन पोपळघट, युवासेना तालुका प्रमुख सागर रामेकर,उपशहरप्रमुख शंकर देशमुख,सामाजिक कार्यकर्ते निरंजन बंड,अंबादास देवकर,अनिल निमकंडे,विजय देवकर,योगेश फुलारी, विलास देवकर,पैलवान संतोष राऊत गजानन गाडगे,विजय काळपांडे यांना सुद्धा श्रेय जात आहे


