गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा : देशात सतत वाढत असलेल्या पेट्रोल आणि डिझेल च्या कींमती मुळे सामान्य जनतेचे जिवन जगने कठीण झाले होते. तेव्हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेल वरील एक्साइज कर कमी करुन पेट्रोल व डिझेल चे भाव कमी केले व जनतेला दिलासा दिला. पेट्रोल आणि डिझेल वर महाराष्ट्र सरकारचा कर देखील प्रतीलीटर चाळीस ते पन्नास रुपये एवढा आहे तरी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने पेट्रोल व डिझेल वरील व्हॅट कर कमी करून जनतेला दिलासा द्यावा अशा प्रकारची मागणी आज भारतीय जनता पक्षाचे वतीने तेल्हारा तहसीलदार यांना निवेदन देऊन करण्यात आली. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष गजानन उंबरकार जिल्हा सरचिटणीस केशवराव ताथोड, भवानी प्रताप.अनुप मार्के. दयालसिंहजी
देशमुख, डॉ ऋषिकेश चोपडे, विजय देशमुख, मनोज अग्रवाल, नरेश आप्पा गंभीरे, सुनील राठोड, ओम सुईवाल, राजेश पालीवाल, गजानन नळकांडे, विजय बोर्डे, शिवा खाडे, धिरज बकाल,बालु पवार. देविलाल गव्हाणे, सचिन सपकाळ, रुषभ ठाकुर, रामेश्वर जळमकर, सुनील भुजबले, मंगेश सोळंके व अतुल विखे, रवी गाडोदीया. उपस्थित होते.