गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा:-तालुक्यातील चारही भागातील रखडलेल्या रस्त्यांची कामे त्वरित सुरू करण्याबाबत तेल्हारा येथील विश्रामगृहावर रविवार दिनांक १४ नोव्हेंबर ला दुपारी दोन वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.तेल्हारा तालुक्यातील शहराला जोडणाऱ्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून रस्त्यांवरील खड्डे व रस्त्यावर सदर ठेकेदाराने टाकलेल्या पिवळ्या मातीमुळे सर्वत्र धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे त्यामुळे प्रवाशांना धूळ व खड्डे असा दुहेरी मार पडत आहे तसेच वाहनधारकांना आपले वाहने चालविणे सुद्धा कठीण झाले आहे या सर्वच रस्त्यांची वाट लागल्यामुळे शासनाला जागृत करण्याकरिता आतापर्यंत अनेक आंदोलने झाली तरीसुद्धा शासनाला जाग न आल्यामुळे
विशाल नांदोकार हा युवा पत्रकार दि. १ जानेवारी २०२२ पासून पुन्हा आमरण उपोषणाचे पाऊल उचलत असून याकरिता पुढील रणनीती ठरविण्याकरिता तेल्हारा तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना सोबत घेऊन एक मोठी चळवळ उभी करण्याच्या उद्देशाने रविवार दिनांक १४ नोव्हेंबर ला तेल्हारा येथील विश्रामगृह येथे दुपारी दोन वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे तरी या बैठकीला तेल्हारा परिसरातील ग्रामीण भागातील गावागावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन रस्त्यांचे कामे लवकर व्हावे याकरिता सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या रस्ता देखरेख समितीने केले आहे.











