गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा : तालुक्यातील गाडेगांव येथे कोविड लसीकरण (व्हॅक्सिनेशन) शिबिर ता. 10रोजी जिल्हा परिषद शाळा गाडेगांव घेण्यात आले संपूर्ण देशात कोरोना या संसर्गजन्य आजाराने थैमान घातले आहे कित्येक नागरिकांना प्राणास मुकावे लागले तिसरी लाट केव्हाही येऊ शकते यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे प्रशासनाला सहकार्य करावे व सांगितलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे व प्रत्येक नागरिकांनी आपला परिवार सुरक्षित राहावा यासाठी व्हॅक्सिनेशन करून घ्यावे तरच कोरोना देशातून हद्दपार होऊ शकतो असे मत पत्रकार गोकुळ हिंगणकर यांनी केले प्राथमिक आरोग्य केंद्र दानापुर अंतर्गत कोविड लसीकरण शिबीर घेण्यात आले आहे व याठिकाणी सर्व जाती धर्माचे नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून कोविड व्हॅक्सिन घेत असल्याचे पाहून तेल्हारा तालुक्यातील गाडेगांव येथील घेतले नागरिक,आरोग्य विभागाचेकर्मचारी,अधिकारी,शिक्षक वर्ग,आशा वर्कर, सेविका हे सर्व अभिनंदनास पात्र आहेत डॉ. भिमकर यांनी मोलाची भूमिका बजावत जास्तीत जास्त 138 नागरिकांचे व्हॅक्सिनेशन करून घेतले लसीकरणाला हजर असलेले डॉ. भीमकर मॅडम .डॉ.राठोड साहेब. आरोग्य सेविका एम.बी .गवई कर्मचारी सविता दिलीप वानखडे.आशा सेविका रंजना विनोद वानखडे आशा हरिदास कराळे विजया अजय वानखडेअंगणवाडी सेविका नलिनी लासुरकर ग्रामपंचायत कर्मचारी गोकुळ खारोडे.अरूण जळमकार यावेळी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.