शरद वालसिंगे
ग्रामीण प्रतिनिधी
अकोट :- महाराष्ट्रातील सर्वात उंच 1646 मिटर असलेले कळसुबाई शिखर महावितरण चे अकोट विभागातील कर्मचारी यांनी विज देयक थकबाकी वसुली संदर्भात संदेश प्रसारीत व प्रसिध्द करण्यासाठी कळसुबाईचे शिखर सर केले दि.06.10.2021 रोजी वेळ 10:15 सकाळी सुरवात केली. महावितरण चे थकबाकी देयकाबबत “विज बिल भरा महावितरण लां सहकार्य करा” अशा घोषणा देऊन या मोहीमेला आंतराष्ट्रीय गिर्रार्यारोहक द माँनटेंड ट्रॉकर्स धिरज कळसाईत याच्या मार्गदर्शना खाली सुरवात झाली. या मोहिमेत कर्मचाऱ्यांनी सहभाग घेऊन मोठ्या जिद्द व चिकाटीने मनोधैर्य वाढवून जिवाची पर्वा न करीता महावितरणवर असले त्यांचे प्रचंड प्रेमआणि वाढलेला विज देयक थकबाकीचा डोंगर कशा प्रकारे कमी करता येईल यांची नवि युक्ती शोधुन संपुर्ण महाराष्ट्रातील विज ग्राहकांना समाजीक संदेश देण्याच्या उद्दीष्टाने तसेच चिंतेच्या अवस्थेत असलेले महावितरण चे अधिकारी व कर्मचारी यांचे मनोबल कळसुबाई शिखरा प्रमाणेच उंचविण्यासाठी या कर्मचाऱ्यांनी संयकाळी 4.:00 वाजता शिखर सर करुन राष्ट्रीय ध्वज फडकवला. व राष्ट्रगीत गायन केले, नंतर थकीत विज बिल भरा महावितरणला सहकार्य करा,विजेची बचत काळाची गरज,सुरक्षा साधनांचा वापर करा जिवितहानी टाळा,विज चोरी टाळा. असे फलक ,बॅनर हातात घेऊन संदेश दिला.निसर्गाप्रती असलेले प्रेम व गो ग्रिन च्या माध्यमातुण विज देयक बिला करीता लागणारा कागद कसा कमी करता येईल व जास्तीत जास्त विज बिल देयकाचा भरणा संगणक प्रणालीव्दारे करता येईल असा गो ग्रिन चा संदेश दिला.या मोहीमेत नेहमीच उत्कृष्ट कामकरणारे , सामाजिक कार्यात पुढकार घेणारे अकोट उपविभागातील योगेश जयकुष्ण वाकोडे वरिष्ठ तंत्रज्ञ,अकोट विभागातील कर्मचारी मानव संसाधन विभागातील अरूण देवबाजी दावले, वित्त व लेखा विभागातील किरण मधुकर पवार, सचिन विकास कुलट वरिष्ठ तंत्रज्ञ,मनिष सुभाषराव डाबरे तंत्रज्ञ,गोपाल केदार कंत्राटी कर्मचारी तसेच अरविंद विष्णुपंत बानेरकर कंत्राटदार या मोहिमेत सहभागी झाले होते.











