अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला
अकोला : जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या आदेशावरून पातुर स्टेशन येथे पातूर येथे 7 ऑक्टोबर रोजी येणाऱ्या उत्सवा दरम्यान कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित अबाधीत राहण्यासाठी पातुर शहरातील मुख्य रस्त्यावर पोलिसांनी रुठमार्च करून शहरातील मुख्य रस्त्याची पाहणी केली. यावेळी ठाणेदार हरीश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा मुख्यालयातील आरसीपी बटालियन ,होमगार्ड सैनिक, पोलीस कर्मचारी सह चार पोलीस अधिकारी यांनी पोलीस स्टेशन ते आंबेडकर चौक, चिरा चौक, देशमुख विटाळ, तेलीपुरा ,गुजरी लाईन, बाळापुर वेस,भोई वेटाळ ,सिदाजी वेटाळ, बाळापुर महामार्ग या मुख्य मार्गावरून पथसंचलन करण्यात आले.











