हिरा आसलकर
शहर प्रतिनिधी मलकापूर
मलकापूर : आज घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर प्रभाग क्र 06 मधिल नळगंगा नगर येथील विकास कामाचे भूमिपूजन श्रीमती सत्यभामाबाई निवृत्ति उंबरकार ग्रा.पं.सदस्य प्रभाग क्र 06 यांच्या हस्ते करण्यात आले. मलकापूर ग्रामीण ग्रामपंचायत 15 वित्त आयोग (ग्रा.पं. स्तर) अंतर्गत श्री.पंडित कळमकर ते श्री.प्रभाकर घोंघटे यांचे घरापर्यंत व श्री.चंद्रकांत ठाकुर ते श्री अढाव यांचे घरापर्यंत च्या डांबरीकरण रस्त्याचे उद्घाटन समारंभ श्रीमती सत्यभामाबाई निवृत्ति उंबरकार ग्रा पं सदस्य प्रभाग क्र 06 यांच्या हस्ते आज पार पडले यावेळी मलकापूर ग्रामीण चे सरपंच कुणालसिंह शक्तिसींह राजपूत, ग्रा.पं.सदस्य बंडूभाऊ बोंबटकार, ग्रा.पं.सदस्य सौ.सुनिता गवात्रे,तथा समस्त ग्रा पं सदस्य व नगरातील प्रभाकर घोंघटे, पंडित कळमकर, चंद्रकांत ठाकुर, रूषिकेश धाडे,राहूल बगाडे,कुणाल नारखेडे,नितीकेश खोडके,विक्रम राणे,शरद ठोसर,मुकुंदा खर्चे,गणेश बढे,सुरेश मगर,शरद देशमुख व समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)