किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातुर शहरात आज पासून सुरू झालेला नवरात्र उत्सवात पहिल्याच दिवशी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान द्वारा श्री दुर्गा दौडचे दिमाखदार पद्धतीने आयोजन करण्यात आले. श्री दुर्गा दौडची सुरवात पातुरचे आराध्य दैवत संत श्री सिदाजी महाराज यांच्या मंदिरात भगव्या ध्वजाचे पुजन करून श्री रेणुका माता मंदिर, छत्रपती श्री शिवाजी महाराज स्मारक,श्री खडकेश्र्वर महाराज,श्री जगदंबा देवी माता मंदिर,श्री बालाजी मंदिर,श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर पत्र्या मारोती मंदिर ते परत श्री सिदाजी महाराज मंदिर येथे येऊन समाप्त करण्यात आली. सुरवातीला श्री संत श्री सिदाजी महाराज मंदिरात भगव्या ध्वजाचे मंत्रोच्चारात कुंकूम तिलकाने ह.भ.प.शाम उगले यांच्या हस्ते पुजन करण्यात आले.यावेळी छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या प्रेरणामंत्रांचे एकमुखाने पठन करण्यात आले.दुर्गा दौडची सांगता ध्येय मंत्रांचे पठन करून देवांचे देव महादेव,महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी माता,करवीर निवासिनी महालक्ष्मी माता, छत्रपती श्री शिवाजी महाराज, छत्रपती श्री संभाजी महाराज,श्री रेणुका माता,श्री संत सिदाजी महाराज यांचा अखंड जयघोष करण्यात आला.या जयघोषाने संपूर्ण पातुर शहर दुमदुमून गेले नवचैतन्याच्या या पहाटेचा नागरिकांनी जागोजागी रांगोळी व पुष्पांनी दौडचे स्वागत झाले. श्री रेणुका माता मंदिरात संस्थानचे अध्यक्ष शंकरराव नाभरे यांनी भगव्या ध्वजाचे स्वागत करून संस्थानच्या वतीने पुजन केले. दुर्गा दौडमध्ये पातुर तालुका विकास मंच ही सहभागी झाले होते. याप्रसंगी आयोजक श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे धारकरी विजय राऊत,पातुर तालुका विकास मंचाचे संयोजक ठाकूर शिवकुमारसिंह बायस,श्री सिदाजी महाराज बाल भजन मंडळाचे संयोजक संगित शिक्षक सुहास देवकर,धारकरी प्रमोद श्रीनाथ,माजी मुख्याध्यापक प्रल्हाद निलखन, सामाजिक कार्यकर्ते व जेष्ठ नागरिक शंकरराव बोचरे,गजानन उगले,सुधाकर उगले गुरूजी, डॉ.विलास हिरळकार, विठ्ठल डिके, मधुकर राखोंडे,ह.भ.प.शशि महाराज अत्तरकार,सोहम बाळू वडतकार, आदित्य विनोद वडतकार,यश ज्ञानेश्वर गायकी,विवेक श्रीकृष्ण खंडारे, चैतन्य विजय राऊत, भावेश राजू श्रीनाथ, गौरव विलास वडकुटे,अनिकेत ज्ञानेश्वर गायकी, कृष्णा नविनकुमार गाडगे, चैताली विनोद वडतकार, चैताली भागवत सातपुते,तन्वी सतिश गणेशे, काजल भगवान श्रीनाथ,दिव्या सुनिल देशमुख,निकीता गजानन देवकर,स्वरा वसंत गाडगे,श्रेया प्रविण निलखन मंगला गाडगे,मनिषा राऊत व इतर मान्यवर उपस्थित होते.