पवनसिंग तोडावत
ग्रामीण प्रतिनिधी अंधानेर
कन्नड : तालुक्यात मोठया प्रमाणात वयोवृद्ध,विधवा निराधार महिला असून त्यांच्या उदरनिर्वाह करिता शासन स्तरावर योजना कार्यन्वित असूनही केवळ उदासीन धोरणामुळे निराधार महिलांना या योजनेचा लाभ मिळत नाही. एक महिन्याच्या आत तालुक्यातील सर्व पात्र लाभार्थी महिलांना पेन्शन सुरू करा. अन्यथा महिलांसह उपोषणाला बसेल असा इशारा माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी दिला आहे. तालुक्यात निराधार महिलांची संख्या मोठया प्रमाणात असून त्यांच्या हक्काची मदत त्यांना मिळत नसल्याने या महिलांसाठी शासन स्तरावर आवाज उठवून त्यांना त्यांच्या करिता असलेल्या योजनेचा लाभ मिळवून दिला पाहिजे. ही संकल्पना हर्षवर्धन जाधव यांच्या सहकारी इशाताई झा यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला होता. शहरातील जैन मंगल कार्यालय पासून मोर्चाला सुरुवात करण्यात येऊन तहसील कार्यालयावर जाऊन तहसीलदार संजय वारकड यांना निवेदन देण्यात आले. महिलांचा मोर्चा यशस्वी करिता सुनील बोडखे, राजू मोकासे,रमेश घनकर,गणेश पाटील,योगेश बिडवे,आदींनी परिश्रम घेतले.










