मधुकर बर्फे
तालुका प्रतिनिधी, पैठण
औरंगाबाद : जिल्ह्यातील पैठण येथे ०७. ऑगस्ट रोजी राष्ट्रीय आदिवासी एकता बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून पैठण बंद भव्य असा मोर्चा काढून केंद्र सरकार व मणिपूर सरकारचा निषेध नोंदविला पैठण शहर बंद मध्ये सर्व सामाजिक संघटना तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते महिला व पुरुषांचा मोठ्या संख्येने उपस्थिती होती. राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेने पुकारलेल्या भारत बंदला पैठण शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून मणिपूर येथील आदिवासी महिलांची नग्न धिंड काढून अमानवी कृत्य केल्या प्रकरणी विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून भव्य असा मोर्चा काढण्यात आला. अनुसुचित जाती अनुसुचित जमाती इतर मागासवर्ग तसेच धर्मपरिवर्तन अल्पसंख्याक समुद्राच्या संविधानिक हक्क अधिकारावर गदा आणणाऱ्या समाननागरी कायद्याच्या विरोधात महापुरुषांचा अवमान करून महाराष्ट्रात तेड निर्माण करणार्या जातीय वाद्यांच्या विरोधात राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेच्या माध्यमातून भारत बंद आव्हान करण्यात आले होते. भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी भारत बंद देशपातळीवर समर्थन दिले असून पैठण येथील सामाजिक संघटनांनी एकत्र येत बहूजन क्रांती आदिवासी एकता समितीच्या वतीने सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत विविध रंगांचे झेंडे व फलक हातात घेवून बहुसंख्येने मोर्चेकरी तहसील कार्यालय येथे धडकले तहसीलदार सारंग चव्हाण यांना विविध मागण्याचे निवेदन देऊन मोर्चाचा समारोप करण्यात आला.