मधुकर बर्फे
तालुका प्रतिनिधी पैठण
पैठण : पैठण तालुक्यातील बिडकीन चितेगाव येथे ३ सप्टेंबर रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने व इतर संघटनांनी पाठिंबा दर्शवत जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आरक्षण मागणीसाठी सरकार विरोधात उपोषणास बसलेल्या मराठा आंदोलन कर्त्यावर अमानुषपणे पोलिसाकडून झालेल्या लाठी चार्ज विरोधात पैठण तालुका बंद हाक पुकारून मराठा सकल समाजाच्या वतीने आरक्षणाची मागणी व जाहीर निषेध नोदवत बिडकीन चितेगाव येथे रास्ता रोको व कडकडीत बंद ठेवण्यात आले या वेळी बिडकीन चितेगाव परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करून बिडकीन पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे हे आपल्या पोलीस कर्मचाऱ्यासह या वेळी आंदोलन कर्त्या सह उपस्थित होते.


