मधुकर बर्फे
तालुका प्रतिनिधी पैठण
पैठण तालुक्यातील चितेगाव गुरुकुल प्रायमरी इंग्लिश स्कूलचा मनमानी कारभार कारभार (आर टी ई)योजनेअंतर्गत ४ थी वर्गात शिक्षण घेत असलेल्या संस्कृती दोरखे विद्यार्थिनींचे वडील शरद राधाकीसन धोरखे हे चितेगाव येथून राजनगाव ता.गगापूर येथे रोजगार करण्यासाठी स्थलांतरित झाले आहे त्यांनी तेथील शिवतेज विद्यामंदिर प्रा.शा. कमळापुर शाळेमधून प्रवेश प्रत्र दि ३१,०७,२३.रोजी गुरुकुल प्रायमरी इंग्लिश स्कूल चितेगाव येथे टि सी मिळण्यासाठी रितसर दाखल केले तरी देखील त्यांना टि सी देण्यात आली नाही ते गेली दोन महिन्यांपासून या शाळेत चक्कर मारत असून त्यांना शाळा व्यवस्थापन समिती जानीव पुर्वक शारीरिक व मानसिक त्रास देत असून अनेक वेळा विनवणी करुनही टि सी देण्यास नकार दिला पैसे दिल्यानंतरच टि सी मिळेल असे गुरुकुल प्रायमरी इंग्लिश स्कूल येथील शाळा व्यवस्थापन मुख्याध्यापक यांनी सांगितले सन २०/ २१/ २२ सालाबाद प्रमाणे शाळा ४५०० रु फी भरण्यास सांगितले
शासन नियमांचे उल्लंघन करत बेकायदेशीररित्या टि सी साठी ४५००, रुपयांची मागणी केली जात आहे (आर टी ई ) हि योजना आर्थिक दुर्बल वंचित घटकातील शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गातील बालकांना पुर्ण पणे मोफत आहे शिक्षण सक्तीचा हक्क या योजनेमध्ये महाराष्ट्र शासन मान्यता समाविष्ट असून (आर टी ई) ही योजना सर्व समाजातील वंचित घटकातील २५. टक्के मुलांना आरक्षणाचा अधिकार आहे तरी देखील प्रायव्हेट शिक्षण संस्था विद्यार्थ्यांकडून पैशाची मागणी करत असून अशा प्रकारे अनेक शिक्षण संस्था पालकांची दिशाभूल करुन पैसे मागणीचे कारस्थान करताना दिसत आहे विषय गंभीर असून याकडे प्रशासन जिल्हा परिषद शिक्षण विभाग प्रमुख अधिकारी यांनी लक्ष देऊन संबंधित शाळेवर कायदेशीर चौकशी करून कार्यवाही करावी अशी मागणी पालक वर्गाकडून केली जात आहे