बबनराव धायतोंडे
जिल्हा प्रतिनिधी पुणे
करमाळा :‘रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान‘ असे समजले जाते. शहरातील विविध रुग्णालयांमध्ये आज काही प्रमाणात रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला आहे. याच अनुषंगाने तरुणाईमध्ये रक्तदानाचे महत्त्व रुजविणे आणि त्यांना रक्तदानासाठी प्रेरित करण्याच्या अनुषंगाने महा.राज्य मच्छिमार संघर्ष कृती समिती अध्यक्ष नंदकुमार नगरे, यांच्या वाढदिवसानिमित्त संपुर्ण महाराष्ट्रात शालेय साहित्य वाटप केल्याचे माहिती कार्यकर्त्यांनी सांगितले.आणि समस्त मच्छीमारी संयुक्त विद्यमाने (ता. ५) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या रक्तदान शिबीरसाठी बारामती शुगरचे हॉ चेअरमन. सुभाष गुळवे, नितीनराजे भोसले, सरपंच शरद भोसले, उद्योजक सुधाकर पांढरे, मेजर ज्ञानेश्वर गलांडे ,मनीषा गवळी, ग्रा प भिगवण सरपंच पराग जाधव, महा.राज्य मच्छिमार संघर्ष कृती समिती उपाध्यक्ष सिताराम नगरे, पप्पु सल्ले, भरत मल्लाव, राजू नगरे, नितीन इरचे,प्रवीण नगरे,विजय नगरे,हनुमंत नगरे, रामदास कनिंचे, माऊली नगरे संजय दरदरे, उज्वला परदेशी, उत्तम दरदरे, संतोष कंचे,दिनकर नगरे, चंद्रकांत भोई,संतोष भोई, किरण गीते,समस्त भोई समाजचे सदस्य उपस्थित होते.