संदीप टूले
तालुका प्रतिनिधी दौंड
जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराविरुद्ध केडगाव येथे मराठा समाजातर्फे बुधवार दि ६ सप्टेंबरला कडकडीत बंदचे यशस्वी आयोजन केले होते.या वेळी शांततामय मार्गाने केडगाव बाजारपेठ मध्ये मोर्चा काढून मराठा आरक्षणाची मागणी करीत निर्दोष आंदोलकांवर अत्याचार करणाऱ्या राज्य सरकारचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला
या वेळी या हल्ल्या विरोधात घोषणाबाजी करून शासनाला जागे करण्यासाठी केडगाव येथील सकल मराठा समाज बांधवांनी महत्त्वाची भूमिका बजावली. याच पार्श्वभूमीवर दौंड तालुक्यातील एक नंबर ची बाजारपेठ म्हणून ओळख असणाऱ्या केडगाव येथील मराठा बांधवांनी केडगाव बंदची हाक दिली होती. व या बंद ला केडगाव येथील मुस्लिम ,धनगर, व ओबीसी तसेच इतर समाजातील विविध संघटनानी पाठिंबा दर्शवला आहे
तसेच या मोर्चा मध्ये केडगाव व पंचक्रोशीतील असंख्य तरुणांनानी ज्येष्ठ व्यक्तींनी सक्रिय सहभाग घेतला होता तसेच शिष्टमंडळाकडून केडगाव येथील ठाणेदारांना एक निवेदन या बाबत देण्यात आले. या बंदला १०० टक्के दिवभर बंद ठेवून व्यापारी बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी किरण देशमुख ,तुषार शेळके, दत्तात्रय शेळके सर, झुंबर गायकवाड, दिलीप हंडाळ ,निलेश मेमाणे, नितीन जगताप आदी मान्यवरांनी या निषेध मोर्चाला मार्गदर्शन केले ….
केडगाव येथे जो निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या मोर्चामध्ये मुस्लिम ,धनगर, माळी, तसेच इतर समाजातील अनेक बांधवांची लक्षणीय उपस्थिती होती. या आंदोलनावेळी काही मुस्लिम कार्यकर्त्यांनी पाण्याचे वाटप करत आपला पाठिंबा दर्शवला.

