भगवान कांबळे
तालुका प्रतिनिधी माहुर
माहुर -स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त मेरी माटी मेरा देश आभीयाना अंतर्गत नगर पंचायत माहुर यांनी पुढील कार्यक्रमांचे दिं९/८/२०२३ रोजी आयोजन केले कार्यक्रमात पंच प्राण शपथ घेने स्वातंत्र्यसैनिक विरांना वंदन आणि वृक्ष दिंडी काढून ७५ देशी वृक्षांची लागवड करून साई रेणुका पार्क मध्ये अमृत वाटीका निर्मिती करावी या उद्देशाने सन्मानिय डॉ राजकुमार गो राठोड मुख्याधिकारी नगर पंचायत माहुर यांनी तहसीलदार किशोर यादव यांच्या हस्ते वृक्षारोपणाला सुरुवात केली यावेळी माहुर नगरीचे नगराध्यक्ष फिरोज दोसानी, माहुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉ नितीन काशीकर, नगर पंचायत चे उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर लाड, सन्मानिय नागरीक,निरधारी जाधव शिवसेना शहरप्रमुख, सन्मानिय वैजनाथ स्वामी साहेब, नगर पंचायत कर्मचारी वृंद व इतर कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत साई रेणुका पार्क वार्ड क्रं १ मध्ये वृक्ष लागवड करण्यात आली आहे.