वैभव गुजरकर
ग्रामीण प्रतिनिधी, अकोट
अकोट : दि. 08/08/2023 रोजी जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम अकोला अंतर्गत मा. उपसंचालक तथा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे मॅडम व निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. भावना हाडोळे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषद वरिष्ठ शाळा क्र 5 अकोट ता अकोट,जिल्हा अकोला येथील विद्यार्थ्यांना शालेय मानसिक आरोग्य, नैराश्य, मोबाईल व्यसनाधिनता व शालेय विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या ताण तणाव याविषयी श्री. अशोक जाधव, मनो. सामाजिक कार्यकर्ता यांनी मार्गदर्शन केले. तसेच श्री जानराव अवघड यांनी राष्ट्रिय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत तंबाखू चे दुष्परिणाम कोटपा कायद्याबाबत मार्गदर्शन केले यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक असलम खान,सर्व शिक्षक व विद्यार्थी उपास्थित होते.