जुबेर शेख
जिल्हा प्रतिनिधी लातुर
निलंगा/सोयाबीन काढताना जमीनीत उतरलेले करंट लागल्याने शेडोळ येथे एक तरूण शेतकरी जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की निलंगा तालुक्यातील शेडोळ येथे आपल्या स्वताच्या शेतात सोयाबीन काढत असताना नागनाथ बाळू कांबळे वय ४० हा तरूण शेतकऱ्याला जमीनीत उतरलेले करंट लागल्याने जागीच ठार झाला असून महावितरच्या गलथान कारभारामुळे हा बळी गेला आहे.मागे झालेल्या वादळी वा-यामध्ये शेतातील विजेचा तार तुटून जमीनीवर ओल्या रानात पडल्याने पाणी असलेल्या ठिकाणी सोयाबीन काढत असताना सदरील शेतकऱ्याला विजेचा धक्का झागल्यामुळे तरूण शेतकरी कांबळे हे जागीच ठार झाला आहे.महावितरणने वेळीच दखल घेऊन दुरूस्ती केली असती तर या शेतकऱ्याचा जीव वाचला असता परंतु महावितरच्या गलथान कारभारामुळे सदरील शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागला आहे.महावितरणच्या चुकीच्या कारभारामुळे व अपघाती निधन झालेल्या या तरूण शेतकऱ्याच्या कुंटुबियाला शासनाने तात्काळ मदत करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. पश्चात आई पत्नी तीन मुली एक मुलगा असा परिवार आहे.