दिपक गोसावी
तालुका प्रतिनिधी तळोदा.
पडली ता.धडगाव येथे दिनांक २५ ऑक्टोबर २०२३ रोजी व्यसनमुक्ती आणि महिला सक्षमीकरण आणि स्पर्धा परीक्षेत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्काराचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ऍड. अभिजीत वसावे तसेच कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून आदिवासी एकता परिषदेचे वरिष्ठ कार्यकर्ते चांगल्याभाई वळवी हे प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमात डॉ. दिलवरसिंग वसावे,रमिला वसावे त्याचबरोबर नव्याने नियुक्त झालेले ऍड. ईश्वर वळवी, दिलीप वळवी, डॉ.केशव वळवी इतर मान्यवरांचा सन्मान याठिकाणी करण्यात आला. करण्यात आला असून पडली येथील सरपंच जयंती वळवी तसेच उपसरपंच कालुसिंग वळवी ऍड.वसंत वळवी, आपसिंग वळवी, छोटू वळवी, के.के.पावरा दिपक वळवी, लालसिंग वळवी,मगन वसावे हे प्रामुख्याने उपस्थित होते.याप्रसंगी चांगल्या वळवी यांनी आपल्या मनोगतमध्ये व्यसन आदिवासी समाजाला कसे बरबाद करत आहे. व समाजात व्यसनाचे प्रमाण कसे वाढत चालले आहे याबाबत मार्गदर्शन केले. सुरुवातीला फक्त तोंड व्यसन करत होते. मात्र आता डोळे,कान देखील व्यसनाधीन झाले आहेत ते कसे त्याबाबत स्पष्टीकरण केले. सुरुवातिला मनुष्य तोंडात द्वारे दारू पिणे, गुटखा खाणे हे करत आला आहे. मात्र आता मोबाईलचा जमाना आल्यामुळे कानाला आणि डोळ्याला देखील व्यसन लागले आहे.याचे दुष्परिणाम आपण अभ्यासतो आहोत त्यामुळे हे व्यसन बंद झाले पाहिजे.मोबाईलचा वापर देखील कमी झाला पाहिजे. तसेच दारू,गुटक्याचे व्यसन कमी झाले पाहिजे ज्यावेळेस हे प्रत्यक्षात येईल तेव्हाच आदिवासी समाजाचा उद्धार होईल. असे चांगल्या वळवी यांनी बोलतांना सांगितले. डॉ. दिलवरसिंग यांनी बोलतांना सांगितले की, आज उभ्या पिकांना सोडून आदिवासी बांधव गुजरात मध्ये स्थलांतर होत आहेत.त्यामुळे उभ्या पिकाचे महत्व त्यांना समजत नाही.उभं पिक सोडणं म्हणजे अन्न धान्याची नासाडी होय.अन्नावाचून जगातील कोणताही जीव जगू शकत नाही. म्हणून आदिवासी समाज हा पूर्वीपासून अन्नधान्य याची पूजा करत त्याचा सन्मान करत आला आहे.परंतु अशा वागण्याने संस्कारहीन समाज होत आहे. आताच्या नात्यागोत्यात अनादर असून एकमेकांच्या वागण्यात सन्मानाची वागणूक दिसून येत नाही. पूर्वी समान आणि एकमेकांना सन्मानाची वागणूक दिली जात होती. मात्र आता तसं दिसून येत नाही. तसेच खानपान बदलल्यामुळे चांगल्या पद्धतीने जगू शकत नाही.त्यामुळे समाजाने आपले पारंपरिक जीवन पद्धत सांभाळली पाहिजे. रमिला वसावे ह्या म्हणाल्या की, विविध लहान लहान बचत गटामार्फत सातपुडातील भगर उद्योग उभा केला असून त्या मार्फत भगर, भात आणि भगर मधून विविध प्रकारचे खाद्य पदार्थ तयार केले जात आहेत.त्यामुळे समाजाला रोजगार उपलब्ध झाला आहे. आदिवासींनी आपल्या दैनंदिन जीवनात भगर चा वापर केला पाहिजे असे त्या म्हनाल्या तसेच ऍड.अभिजीत वसावे यांनी अध्यक्षीय भाषणात सर्वप्रथम गाव संघटित असणे आवश्यक आसल्याचे प्रतिपादन केले. गाव संघटित असेल तर गावामध्ये कोणतीही समस्या निर्माण होणार नाही म्हणून गावात एकाच रक्ताचे लोक राहत असून गाव हे संघटित असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर गावातील पडीक जमिनीत जागेत झाडे लावणे .झाडाचे उत्पन्न मधून देखील गावाची आर्थिक स्थिती मजबूत करता येईल गुजरात मध्ये लोकांना स्थलांतरित होण्याचे थांबवता येईल.वेगवेगळ्या ठिकाणी मजुरांचे शोषण होत आहे ते थांबवता येईल. असे ते यावेळी म्हणाले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ऍड.आपसिंग वळवी, सरपंच,उपसरपंच,
ग्रामसेविका तसेच ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.