दिपक गोसावी
तालुका प्रतिनिधी तळोदा
तळोदा: तळोदा येथील शासनमान्य मुद्रांक विक्रेता व दस्तलेखनिक समिती यांच्या वतीने महाराष्ट्र शासनाकडे विविध मागण्या मान्य होणे कामी तळोदा तहसीलदार गिरीश वखारे यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, राज्यभर सुमारे ५००० मुद्रांक विक्रेते व दस्तलेखनिक, पिटीशियन रायटर म्हणून मान्यताप्राप्त रोजगाराच्या दृष्टीने कार्यरत आहेत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महसूल व्यवस्था अस्तित्वात आल्यापासून सुमारे ५० वर्ष पूर्वीपासून म्हणजेच ब्रिटिश काळापासून मुद्रांक विक्रेते व दस्तलेखनिक हे राज्यातील जनता व शासन यामधील दुवा म्हणून काम करीत आहेत. तसेच शासन इगव्हर्नरच्या योजना ह्या ज्या वेळेस राबवते त्या त्या वेळेस योजना जनतेपर्यंत पोचवण्यात व पूर्णत्वास नेण्यास नेहमीच आमचा हातभार लागलेला असतो. व या कामी आम्ही नेहमी प्रयत्नशील असतो. आणि शासनाला महसूल मिळवून देत असतो.असे असतांना ही शासन नवीन धोरण अवलंबित असून आमची स्टॅम्प विक्रीची मर्यादा ३०००० वरून १०००० हजारावर आणली आहे. त्यामुळे आमच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. १००० तसेच ५००० हजार किमतीच्या मुद्रांकाची छपाई सुद्धा बंद केली आहे. तसेच भविष्यात १०० रुपये व ५०० रुपये किमतीचे मुद्रांकाची सुद्धा छपाई बंद करण्याचे शासन विचाराधीन आहे. त्याबाबत वेळोवेळी शासनाकडून सुतोवाच ही करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील मुद्रांक विक्रेते व दस्तलेखनिक यांच्या व्यवसायावर भविष्यात मोठे संकट येऊ घातले आहे आहे. शासनाने आम्हा कोणाचाही या ठिकाणी विचार केलेला नाही.शासन मुद्रांक विक्री बंद करून बँकेमार्फत फ्रेंकिंग द्वारे विक्री करण्याचा विचाराधीन आहे. असे झाल्यास आम्ही आमचे कुटुंब कसे चालवावे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा भागवावा हा मोठा प्रश्न आम्हा पुढे येऊन ठेपलेला आहे. त्यामुळे शासनाकडे त्यांनी मागणी आहे की, १०० रुपये व ५०० रुपये किमतीचे मुद्रांक बंद करण्याचा निर्णय न घेता शासनाच्या नवीन प्रणालीत मुद्रांक विक्रेते व दस्तलेखनिक यांना सामावून घेण्यात यावे व आमच्या मार्फत फ्रेंकिंग अथवा अन्य योजना राबविण्यात याव्यात त्याचबरोबर आमचे कमिशन ही वाढविण्यात यावे. अशी प्रमुख मागणी त्यांच्यावतीने या निवेदनात करण्यात आली आहे. या संदर्भात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शासनमान्य मुद्रांक विक्रेता व दस्तलेखनिक कृती समिती तर्फे राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी ३० ऑक्टोबर २०२३ वार सोमवार रोजी मुद्रांक विक्री व कामकाज बंद ठेवून एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचेही या निवेदनात त्यांनी म्हटले आहे.
निवेदनावर नासिर हुसेन मक्रानी,संजय चव्हाण,फरीदखान पठाण,संजय पटेल, जगदीश पाटील, सुपडू मगरे,सिद्दिकअहमद पिंजारी, जितेंद्र मराठे, महेंद्र पाडवी, मुश्ताक शिकलीकर,गोरख सोनवणे,उद्धव पाडवी इत्यादीच्या स्वाक्षऱ्या आहेत.