रितेश टीलावत
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
कुणबी समाजातील पोट जातीतील भेद संपवून पोटजाती अंतर्गत विवाह संबंध जुळावेत या उद्देशाने व वेळ,पैसा व श्रमाची बचत व्हावी या हेतूने जगतगुरु प्रबोधन मंडळ तेल्हारा तर्फे 3 डिसेंबर रोजी सकल कुणबी समाजाचा भव्य उपवर युवक-युवती परिचय मेळावा आयोजित केला आहे. भागवत मंगल कार्यालय तेल्हारा येथे सकाळी 11 वा.संपन्न होणाऱ्या मेळाव्याचे अध्यक्ष नत्थूजी खोटरे तर उद्घाटक सौ.देवश्रीताई ठाकरे राहणार आहेत. मा.आ.श्री नारायणराव गव्हाणकर, जि. प. उपाध्यक्ष सुनिल फाटकर, पंचायत समिती सभापती आकोट सौ.हरिदिनीताई वाघोडे,उपसभापती संतोष शिवरकार,जि. प.सदस्य अनंतराव अवचार, सौ. सुलभाताई दुतोंडे, गजानन काकड,प्रकाश आतकड, प.स.तेल्हारा सदस्य अरविंद तिव्हाणे, सौ. जयश्रीताई लांडे, सौ. जयश्रीताई घंगाळ यांच्या विशेष उपस्थितीत तर विजय कौसल,डॉ.बाबुराव शेळके,प्रभाकरराव मानकर, प्रकाश बोर्डे, शंकरराव खुमकर, शंकरराव फुंडकर,कैलास गोंडचवर,देवानंद नागळे, प्रकाश वाकोडे प्रदिप वानखडे,श्रीकृष्णगोडबोले, सौ.संध्याताई वाघोडे, सौ. शोभाताई शेळके, सौ. कृतिकाताई ढबाले आणि युवा आदर्श शुकदास महाराज गाडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणाऱ्या या मेळाव्याला सकल कुणबी समाज बांधवांनीआणि भगिनींनी उपस्थित राहावे असे आवाहन जगतगुरु प्रबोधन मंडळाचे अध्यक्ष महेंद्र कराळे,सचिव राजेश बुरघाटे,कुणबी समाज मंडळ तेल्हारा तालुका अध्यक्ष संदिप खारोडे व तेल्हारा शहराध्यक्ष रामेश्वर हागे यांनी केले आहे.