फैय्याज इनामदार
तालुका प्रतिनिधी जुन्नर
ओतूर : येथील बसस्थानकाच्या परिसरात डुंबरवाडी टोलनाक्यावरी रुग्ण वाहिका क्रमांक एम एच १४ एच यु ०१०९ वरील चालकाने वाहन पाठीमागे घेताना हलगर्जी पणा दाखवत एका व्यक्तीस दोन वेळा चिरडले असतानाचे सी सी टीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. ही घटना दि.१ जुलै रोजी सायंकाळी ६:३० वाजण्या च्या सुमरास घडली आहे. या अपघातातील व्यक्तीचे नाव रज्जाक मुंढे रा. ओतूर ता. जुन्नर हे गंभीर जखमी झाल्या मुळे त्यांना चालक कुणाल डुंबरे व प्रतीक डुंबरे यांनी त्याच रुग्णवाहिकेने आळेफाटा येथील माऊली हॉस्पिटल मध्ये दाखल केले आले होते मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुणे येथील ससून रुग्णालयात उपचार कामी दाखल करण्यात आले होते परंतु त्यांचा ६ जुलै रोजी दुर्दैव अंत झाला असल्याची माहिती रुग्णाच्या नातेवाईकांनी दिली आहे. या अपघाता बाबत जमीर बाबुलाल मुंढे यांच्या फिर्यादी नुसार रुग्णवाहिका चालक कुणाल तुकाराम डुंबरे रा. डुंबरवाडी ता. जुन्नर याच्यावर विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघात झाल्या पासून ही रुग्णवाहिका ओतूर पोलीस स्टेशनला लावण्यास उशीर का झाला असावा अशी चर्चा परिसरात रंगु लागली आहे.