बबनराव धायतोंडे
जिल्हा प्रतिनिधी पुणे
दौंड : वाटलूज, ता. दौंड येथील कु. आकाश लालासो कदम याची सुमारे २.५० लक्ष रुपये खर्चाची पोटाची अवघड शस्त्रक्रिया पुण्यातील एका नामांकित रुग्णालयात संपूर्णपणे मोफत करण्यात आमदार राहुल दादा कुल यांना यश आले आहे. तसेच आमदार राहुल कुल यांनी दौंड तालुक्यातीलच नव्हे तर संपूर्ण पुणे जिल्ह्यातील पेशंट च्या अनेक शस्त्रक्रिया पुणे, मुबंई येथील रुग्णालयात मोफत केल्या आहेत.म्हणून ते दौंड तालुक्याचे आरोग्यदुत आमदार म्हणून ओळखले जात आहेत. आज कदम कुटुंबीयांनी आमदार राहुल कुल यांची राहू निवासस्थानी येऊन भेट घेतली व आभार व्यक्त केले.यावेळी त्यांच्या तब्बेतीची चौकशी करून त्यांना उत्तम प्रकृत्ति व दीर्घायुसाठी आमदार राहुल कुल यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच चि. संस्कार शहाजी डोंबे रा. खोर ता. दौंड याच्या वैद्यकीय उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून १,००,०००/ रुपयांचा निधी मिळवून देण्यात यश आले आहे.त्याचे मंजुरी चे पत्र डोंबे कुटुंबियांना नुकतेच सुपूर्त केले.तसेच यावेळी वाटलुज चे कु. आकाश कदम चे नातेवाईक आणि युवा नेते योगेश थोरात हे देखील उपस्थित होते.