तिसरी लाट धडकल्याने सुरळीत सुरू असलेली शाळा झाली बंद.
सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली.
गडचिरोली:- जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना दररोज शाळेत येणे,वर्गात बसणे,लिहणे,वाचणे,खेळणे अशा शाळामय वातावरणातून अभ्यासाची गोडी लागली होती.मात्र ऐन विद्यार्थी,शाळा भरात आली असतांना कोरोनाने हजेरी लावली.कोरोनाच्या यापूर्वीच्या दोन्ही लाटेने मागील सलग दोन सत्र विस्कळीत करून शालेय अभ्यास, मौजमजा असे सारेच हवेहवेसे वाटणारे शैक्षणिक जीवन पार गिळंकृत केल्याचा दुहेरी अनुभव झेलल्यामुळे परत तिसऱ्यांदा तिसरे शैक्षणिक सत्र कोरोनाने खंडित केले आहे.काही विद्यार्थ्यांनी आनंद तर काहींनी शाळा बंद होणार म्हणून नाराजी व्यक्त केली.सध्या सन 2021-2022 या शैक्षणिक वर्षांचे दुसरे सत्र सुरू आहे.हे शैक्षणिक सत्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने नेहमीच्या 26 जूनला सुरू होणारी शाळा 15 जुलैला झाली. सुदैव कि गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण शहरी शाळा शनिवारपर्यंत अगदी सुरळीतपणे चालू होत्या. परंतु कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने राज्यात प्रवेश केल्यामुळे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आणि कोरोना साखळी तोडण्यासाठी 10 जानेवारी ते 15 फेबुवारी पर्यत शाळा व वर्ग बंद ठेवण्याचे निर्णय घेण्यात आले. जिल्ह्यातील पहिली ते नववी आणि अकरावीचे वर्ग बंद करण्यात आलेले आहेत. तर गडचिरोली जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी राजकुमार निकम यांनी जिल्ह्यातील अनेक शाळेत भेटी देऊन सगळ्या परिस्थीचे पाहणी केली.त्यावेळी त्यांनी इयत्ता दहावी आणि बारावीचे वर्ग नियमित पुढे सुरू राहणार असुन शिक्षकांनी नियमित सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत शाळेत उपस्थित राहण्याचे आदेश दिले.ग्रामीण भागाचा विचार केल्यास शाळा म्हणजे विद्यार्थ्यांसाठी एक पर्वणी असते. सर्वांत पहिल्यांदा मार्च 2020 मध्ये लॉकडाऊन लागले त्यावेळी शाळा बंद झाल्या.त्यामुळे शैक्षणिक सत्र 2019-2020 प्रभावित झाले. कोरोनाची पहिली लाट खुप दिवस लांबल्याने शैक्षणिक सत्र 2021-2022 पण उशिरा सुरू झाले. 23 नोव्हेंबर 2020 ला शैक्षणिक सत्र 2020-21 सुरू झाले. पण आणखी मार्च 2021 महिन्यातच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने शाळा बंद पडल्या. आणि आता चालू शैक्षणिक सत्रात 19 दिवस उशिरा सुरू झालेल्या शाळा आणखी तब्बल 179 दिवसानंतर अगदी व्यवस्थित अशी चाललेली शाळा 10 जानेवारी पासुन बंद झाली आहे.मात्र दहावी,बारावी वर्गांचे विद्यार्थी शाळेत उपस्थित असणार आहेत.मागील दोन सत्रात कधीही भरून न निघणारे शैक्षणिक नुकसान झाल्याचा कटु अनुभव बाजूला सारत ग्रामिण भागातील गावखेड्यातील विद्यार्थी आता कुठे शाळेत,अभ्यासात,खेळात गुंतले असतांना कोरोनाने घात केल्याने पण अभ्यासू आणि होतकरू असे विद्यार्थी शाळा बंद होणार हे कळताच त्यांचे चेहरे हिरमुसलेले दिसले.कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील शाळा सरसकट बंद करण्यापूर्वी शासनाने त्या ठिकाणी कोरोना रुग्ण संख्या आणि संक्रमण याबाबत स्थानिक प्रशासनासोबत अभ्यास करून निर्णय घेणे आवश्यक होते.ग्रामिण भागात अनेक ठिकाणी नेटवर्क ची समस्या असुन प्रत्येक ठिकाणी आनलाईन शिक्षण होणार नाही.गावखेड्यात प्रत्यक्ष वर्गात होणारे ऑफलाईन शिक्षण सर्वांत प्रभावी आणि पसंतीस उतरणारे आहे.ग्रमिण भागात ऑनलाईन शिक्षण फक्त नावालाच आहे.