मनोज गवई तालुका प्रतिनिधी चांदुर रेल्वे
चांदुर रेल्वे :36 धामणगाव विधानसभा क्षेत्रातील अधिकारी व कर्मचारायाचा सहभाग २६ एप्रिल रोजी होणा-या वर्धा लोकसभा निवडणुकीकरीता ३६- धामणगाव रेल्वे विधानसभा मतदा संघातील मतदान अधिकाऱ्यांचे निवडणुक प्रशिक्षण शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) व बिडीएस हायस्कूल, चांदूर रेल्वे येथे शनिवारी (ता. २३) सकाळी व दूपारी अश्या दोन सत्रात चांदूर रेल्वे उपविभागीय अधिकारी तेजश्री कोरे यांच्या मार्गदर्शनात पार पडले.लोकसभा निवडणुकीत दुस-या टप्यात वर्धा लोकसभेची निवडणुक होणार असुन या करीता प्रत्यक्ष मतदान २६ एप्रिल रोजी सकाळी ७ ते संध्याकाळी ६ या कालावधीत होणार आहे. या निवडणूकीचे मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी असे एकुण ९०० कर्मचाऱ्यांनी पहिले प्रशिक्षण घेतले. मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांनी मतदान केंद्रावर करावयाची कामे, विविध फॉर्म कसे भरावेत याविषयीचे सखोल मार्गदर्शन पॉवर पॉईंट प्रझेंटेशनव्दारे नांदगाव खंडेश्वर तहसिलदार भुसारी यांनी समजावुन सांगीतले. यावेळी उपविभागीय अधिकारी तेजश्री कोरे यांनी प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांना निवडणुक प्रक्रिया संदर्भात मार्गदर्शन दोन सत्रात पार पडले प्रशिक्षण केले. तर स्थानिक बीडीएस हायस्कूल येथे चांदूर रेल्वे तहसिलदार पूजा माटोडे, धामणगाव रेल्वे तहसिलदार गोविद वाकडे यांच्या मार्गदर्शनात महसुल कर्मचारी यांनी मतदान केंद्राध्यक्ष व पीआरओ-१ यांना ईव्हीएम मशिन, व्हीव्हीपॅट हाताळणे व त्यांची जोडणी, मॉकपोल, सीआरसी कसे करायचे यांचे प्रशिक्षण दिले. तर मतदार केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशिन हाताळले. यानिवडणुकप्रशिक्षणासाठी धामणगाव रेल्वे चे संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसिलदार पाटील, चांदूर रेल्वे निवडणुक विभागाचे नायब तहसीलदार अजय बनारसे, नायब तहसिलदार तिवारी, नायब तहसिलदार वासनिक, निवास नायब तहसिलदार सुधाकर अनासुने यांसह सर्व झोनल अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी व महसुल कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.