कैलास शेंडे जिल्हा प्रतिनिधी नंदुरबार
तळोदा:आपला फायदा करुन घेण्यासाठी किंवा दुसऱ्याची फसवणूक करण्यासाठी कोण काय युक्ती करेल सध्या सांगताच येत नाही. चक्क न्यायदेवते समोरच बनावट शपथपत्र दाखल करुन बोगस वारसदार बनुन खोटे अर्ज व खोटे दस्ताऐवज दाखल करुन खऱ्या मयातच्या वारसांना मिळणाऱ्या काही आर्थिक लाभापासुन वंचित ठेवण्याचा इराद्याने तळोदा न्यायालयात शासनाची देखील फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तळोदा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की,१) जिरुबाई माणिक पावरा वय -५७ २) नागेश माणिक पावरा वय -२४ ३) महेश माणिक पावरा सर्व राहणार भोगवाडे ता अक्राणी जि. नंदुरबार यांनी संगनमत करुन मा. तळोदा न्यायायलायात वारस दाखला मिळणेबाबत खोटे अर्ज व खोटे दस्तऐवज दिनांक ०८ जुन २०२३ ते १४ जुलै २०२३ दरम्यान दाखल करण्यात आले होते. वरील तिघे वारस नसतांना तळोदा न्यायालयात वारस असल्याचे खोटे शपथपत्र दाखल केले. खऱ्या वारसदाराला आर्थिक लाभ मिळू नये. या हेतूेने बनावट कागदपत्रांद्वारे आरोपींनी शासनाची देखिल फसवणूक केली आहे. शितल निलेश पावरा राहणार रोषमाळ बुद्रुक ता अक्राणी तळोदा न्यायालयातून सी.आर.पी.सी.१५६(३) प्रमाणे फिर्याद दिल्याने तळोदा पोलीस ठाण्यात भा.द.वि.कलम ११९ ब,१९१,१९२,१९३,४२०,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक महेश निकम करीत आहेत. बोगस वारस दाखल्याच्या आधारे जमिनी बळकावण्याचा घटना घडत असल्याचे अनेक ठिकाणी गुन्हे नोंद होत असतात. बनावट दस्तऐवज प्रकरणी महसूल विभागातील काही अधिकारी,कर्मचारी लाचेच्या लालसेपायी दस्त नोंदवून घेतल्याच्या घटना घडताना पहावयास मिळतात. न्यायालयात मयाताचा मुर्त्यू दाखला तसेच वारस असलेल्या व्यक्तीचे आधार कार्ड, शपथ पत्र दाखल करुन २ ते ३ महिन्याच्या कालावधीत वारस दाखला तयार होऊन मिळतो. मग मयताच्या मालमत्तेवर वारसाचे नाव लावण्यात येते.तसेच त्याच्या बँकेतील ठेवीवर व विमा पॉलिसी वर मिळणाऱ्या रक्कमेवर हक्क अधिकार वारसांना मिळतो.


