अशोक कराड ग्रामीण प्रतिनिधी करंजी
अहिल्यादेवी नगर: पारनेरच्या विकासासाठी आत्तापर्यंत विखे पिता पुत्राचा एकही रुपयाचा निधी दिला नाही. गेल्या अनेक वर्षापासून पारनेरचा कारभार विखे कुटुंब पाहत आहेत. पारनेरचे अनेक वर्षापासून विकी कारण यांनी राजकारण केलेले आहे. त्या राजकारणाचा फक्त फायदा त्यांना झाला आहे. नुसत्याच विकासाच्या गप्पा मारून विखे पिता पुत्रांचे पारनेर साठी योगदान काय आहे? असा खोचक सवाल पारनेरचे आमदार श्री निलेश लंके यांनी केला आहे. पारनेर शहरातील 38 कोटी रुपयांचा विविध विकास कामाचे भूमिपूजन व लोका अर्पण आमदार लंके यांच्या हस्ते झाले. त्यावेळेस लंके कार्यक्रमांमध्ये बोलत होते. त्या सभेचे अध्यक्ष स्थानी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाबत बाबासाहेब तरटे होते. आपल्या दक्षिणचे खासदार सुजय विखे यांनी या पारनेर शहरासाठी आत्तापर्यंत काय केले असा खोचक टोला श्री लंके यांनी लावला आत्तापर्यंत एक रुपयाचा ही निधी पारनेर शहरासाठी दिला नाही असा खोचक टोला व प्रत्यारोप केला आहे. मी आत्तापर्यंत पारनेर साठी विकास कामासाठी 130 कोटीचा निधी दिला आहे. आणि या पारनेर शहरासाठी 130 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला असल्याचे श्रीलंके यांनी सांगितले आहे यांनी यावेळी शहरात झालेल्या कामाची व मजूर कामाची वाढीव वाचून दाखवली व ते म्हणाले की शहराची विविध प्रश्न प्रलंबित आहेत पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण झाली आहे हे लक्षात घेऊन आपण पाठपुरावा केल्याने मुळा धरणातून प्रस्तावित 75 कोटी रुपये खर्चाची पाणी योजनेची मंजुरी अंतिम टप्प्यात आहे. पारनेर बस स्थानकासाठी 18 कोटी व उपजिल्हा रुग्णालय साठी 35 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. तसेच शहराच्या सर्व बाजूच्या रस्त्याची चौपदरीकरण व आठ कोटी रुपये खर्चाच्या बगीच्या व दशक्रिया विधी घाटाच्या शोशोभीकरणाला मंजुरी मिळाली असल्याचेही आमदार श्रीलंके यांनी सांगितले यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य श्री राणी लंके, अर्जुन भालेराव माजी सभापती सुदाम पवार डॉक्टर बाबासाहेब कावरे प्राध्यापक संजय लाकूड जोडे, संजय वाघमारे, नगराध्यक्ष नितीन अडसूळ उपनगराध्यक्ष जायदा शेख मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक विनय शिपाई या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. पारनेर शहरासाठी भरीवासी मदत श्रीलंके साहेबांनी दिलेली आहे.