प्रकाश कांबरे तालुका प्रतिनिधी हातकणंगले
हातकणंगले : टोप ता. हातकणंगले येथे ग्राम पंचायत व शिरोली पोलिस यांची यात्रा व लोकसभा निवडणूक याबाबत संयुक्त मिटींग बिरदेव मंदिरमध्ये संपन्न झाली.प्रारंभी शिरोली सपोनि पंकज गिरी यांनी लोकसभेची आदर्श आचार – संहिता लागू असल्याने त्रैवार्षिक बिरदेव जळ यात्रेनिमित्त कालावधीत सर्वांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे असे आवाहन केले. पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर बिरदेवाची त्रैवार्षिक जळ यात्रेची सुरुवात होते. सदरचा यात्रा महोत्सव पाच दिवस चालतो. या यात्रेकरिता महाराष्ट्रासह इतर अन्य राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असल्याने हजारो भाविक दर्शनासाठी येतात. यात्रेनिमीत्त टोप गावांत लहान मुलांची खेळणी, खाऊ स्टॉल लागतात त्यामुळे मोठी गर्दी होते. दहावी परिक्षा संपल्याने यावेळी मुली व विशेषता महिलांची लक्षणीय उपस्थिती असते.टोप सरपंच तानाजी पाटील म्हणाले की ग्रामपंचाय मार्फत पाणी, स्वच्छता व लोकांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊ, यात्रा शांततेत व आचारसंहितेचे पालन करुन व्यवस्थीतपणे पार पाडण्या- साठी प्रयत्न करू.या बैठकी प्रसंगी शिरोली सपोनि पंकज गिरी, टोप सरपंच तानाजी पाटील दिलीप मुळीक,,बापू पवार,कृष्णात सिसाळ, संदीप सिसाळ, किरण पुजारी, अविनाश कलकुटगी, गोपनीय चे निलेश कांबळे पवार, दीपक पाटील,अवघडी गांजणे, सुखदेव पुजारी, सागर पुजारी, सर्जेराव सिसाळ, अमोल सिसाळ, शिवाजी सिसाळ, वसंत पुजारी, कामांना पुजारी आदी उपस्थित होते.


