सतिश मवाळ
ग्रामीण प्रतीनीधी मेहकर
हिवरा आश्रम दि.12 जानेवारी रोजी नित्यानंद सेवा प्रकल्प हिवरा आश्रम येथे विवेकानंद अर्बन व विवेकानंद फाउंडेशन मेहकर च्या संयुक्त विद्यमानाने गरजु व निराधार मुलांना शैक्षणिक साहित्य व किराणासह अन्नधान्य वाटप करून सामाजिक बांधिलकी राखत स्वामी विवेकानंद व माँ साहेब जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली.
विवेकानंद अर्बन परिवार व विवेकानंद फाउंडेशन मेहकर अध्यक्ष ॲड.शिव ठाकरे पाटील यांनी पतसंस्था व फाउंडेशन च्या वतीने विवेकानंद व माँ साहेब जिजाऊ यांच्या जयंती निमित्त हिवरा आश्रम येथील नित्यानंद सेवा प्रकल्प येथे राहत असलेल्या निराधार मुलांना आधार देण्याचे कार्य अनंत शेळके सर करीत आहेत. त्यांचे कार्य खरच खूप लाख मोलाचे आहे.या सेवा प्रकल्पामध्ये जवळपास 35 निराधार विधार्थी राहतात त्यांचा शैक्षणिक खर्च,भोजन,कपडे,दवाखान्याचा इतरही संपूर्ण खर्च हे सेवा प्रकल्पाच्या माध्यमातून करण्यात येत असतो.या कार्यात आपले सुद्धा योगदान व हातभार असला पाहिजेत या दृष्टिकोनातून तसेच विवेकानंद यांनी संपूर्ण जगाला ज्या प्रकारे शिकवणी दिले आहे.त्याचे विचार आचारनात अंगीकृत करुण सेवाभाव जपला पाहिजे याच अनुषंगाने संस्थेने विवेकानंद व माँ साहेब जिजाऊ यांची जयंती सामाजिक सेवाभाव जोपासत साजरी करण्यात आली.आज स्वामी विवेकानंद पतसंस्थेच्या वतीने 35 निराधार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य,किराणा किटचे वाटप करण्यात आले.त्यावेळी कार्यक्रमामध्ये संस्थेचे अध्यक्ष अॅड.शिव ठाकरे पाटील बोलतांना म्हणाले की,
विवेकानंद अर्बन व विवेकानंद फाउंडेशन हात ज्या प्रमाणे मजबूत होतील त्या त्या प्रमाणे आम्ही माणुसकी दाखवत यापुढे नित्यानंद आश्रमास अर्थ सहाय्य करून हातभार लावण्याचे कार्य करत राहु.तसेच त्यांनी थोडक्यात राष्ट्रमाता माँँ जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या विचारांवर व जिवन चारित्र्यावर प्रकाश टाकला.
यावेळी सेवा प्रकल्पाच्या वतीने संस्थेच्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला.त्यामध्ये मुलांनी मा जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावरील गीत सादर केले.गीत ऐकून सर्व मान्यवर भावुक झाले.त्यावेळी मंचावर अध्यक्ष अँड.शिव ठाकरे पाटील,नित्यानंद सेवा प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनंत शेळके सर,सल्लागार स्वप्निल खराटे,सरपंच कल्याना प्रशांत काळे,सल्लागार प्रल्हाद अन्ना लष्कर,अक्षत दिक्षित,युवक कोंग्रेस जिल्हा सचिव दिलीप बोरे,सल्लागार रोशन महाजन,राज्य संघटक लोहार फाऊडेशन गजानन डाखोरकर,संचालक गणेश निकस,महेश ठाकरे,गजानन चाळगे,पत्रकार समाधान पदमने,पत्रकार सतिश मवाळ,संजय सोनुने,व्यवस्थापक शुभम मवाळ,रोखपाल दिपक निकस,लिपिक गोपाल गायकवाड,प्रकाश ठाकरे,उमाकांत मिसाळ,पत्रकार विश्वबर दळवी,सदानंद शेळके सर,हार्दिक महाजन व विद्यार्थी उपस्थीत होते. दिलीप बोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.











