किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातूर : स्थानिक रवींद्र नगर येथील ब्रह्माकुमारीज च्या शाखेच्या वतीने स्वामी विवेकानंद यांची जयंती राष्ट्रिय युवक दिवस म्हणून साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा ब्र. कु. लीना दीदी, संचालिका, ब्रह्माकुमारीज पातूर या असून मुख्य वक्ता ब्र. कु. प्रभा दीदी, अतिथी प्रा. अस्मिता खामरे, प्रा. अतुल विखे हे मंचावर उपस्थित होते.सर्वप्रथम परमपिता परमेश्वरासह राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना स्मरून दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रा. अस्मिता खामरे यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. युवकांनी आपले ध्येय गाठण्यासाठी सकारात्मक विचार, दृढता, सचोटी, प्रामाणिकपणा इत्यादी गुण आपल्या अंगी धारण करावे असे ब्र. कु. प्रभा दीदी म्हणाल्या. राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी राजांना घडवले त्याप्रमाणे सर्व पालकांनी आपल्या पाल्यांना सुसंस्कारीत करावे तसेच स्वामी विवेकानंद यांच्या प्रमाणे सर्व युवकांनी आध्यात्मिकते द्वारे आपले व्यक्तिमत्व घडवावे असे प्रा. अतुल विखे यांनी सांगितले. अध्यक्षीय मार्गदर्शन करताना ब्र. कु. लीना दीदींनी युवकांनी संगदोष व व्यसनाधिनता पासून दूर राहण्याचा सल्ला दिला. तसेच वडिलधाऱ्यांचा आदर सन्मान करावा व सोशल मीडियाचा सकारात्मक उपयोग करावा असे सांगितले. या कार्यक्रमाचे संचालन कु. वैष्णवी उंडाळ हिने तर आभार कु. कीर्ती घोरे हिने मानले. कोरोना चे सर्व नियम पाळून युवक युवतींनी कार्यक्रमाचा लाभ घेतला.