किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातुर तालुक्यातील आगिखेड शेत शिवारात सकाळी काम करत असताना अचानक रानटी डुकराच्या हल्ल्यात शेत मजूर जखमी झाले या परिसरात जंगली जनावरे जास्त प्रमाणात आढळत असल्याने जनावरांमुळे जखमी झालेल्यांच्या घटना समोर येताना दिसत आहे. येथील वैभव गाडगे,निलेश उगले, शिवाजी उगले,परशराम काळे हे इसम आपल्या शेतात काम करत असताना रानटी डुकराने त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असता स्वताचा बचाव करण्याकरिता त्यांनी झाडाचा सहारा घेतला. परशराम काळे हे विहीरीच्या जवळ असलेल्या झाडावर घाबरल्या मुळे चढत असताना त्यांचा हात घसरून ते विहिरीत पडले सुदैवाने ते जखमी झाले नाही.अशे प्रकार घडत असल्याने इतर मजूर व शेतकरी शेतात शेत मजुरी करिता जाण्यास भीत आहेत व या परिसरात जंगली डुकरा मुळे भीतीचे वातावरण पसरले आहे अशी दुसरीकडे
आगिखेड येथे रानटी डुकरच्या हल्यात शेत मजूर जखमी झाले
आज दिनांक:-१३/०१/२०२२ रोजी. सकाळी आगिखेड शेत शिवारात. शेत मजूर दिनकर सदाशिव गाडगे, रा. आगिखेड शेतात शेत मजुरी ने काम करत असताना अचानक रानटी डुकराने हल्ला केला.या हल्यात शेत मजूर जखमी झाले आहे.जखमी मजुरावर पातूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचार करण्या करिता नेण्यात आले आहे वनविभागाने तत्परतेने या परिसरामधील जगली जनावरांचे व्यवस्थापन करण्याची मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.











