घुटेच्या प्रयत्नाने भामरागड तालुक्यात शेतकऱ्याना उपलब्ध झाले होते बारदाने.
सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली.
गडचिरोली/भामरागड:- गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील शेतकऱ्यांना महामंडळात धान विक्रीकरिता बारदाने उपलब्ध नसल्याने तालुक्यातील शेतकरी अडचणीत होते.याची दखल घेत शिवसेनेचे सुभाष घुटे यांनी बारदान तात्काळ उपलब्ध करून देण्याकरीता अधिकाऱ्यांशी चर्चा करून एका दिवसाच्या आत बारदाना उपलब्ध करून दिल्यामुळे भामरागड येथील शेतकऱ्यांनी दि.12 जानेवारीला सकाळी 10 वाजता शिवसेना कार्यालयात शिवसेनेचे सुभाष घुटे यांचा शाल देवुन सत्कार करण्यात आले. यावेळी सुभाष घुटे यांनी हा सत्कार माझा एकट्याचा नसून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवसैनिकांचा आणि वंदनिय बाळासाहेब ठाकरे तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आदित्य ठाकरे साहेब पर्यावरण मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई तसेच गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे व जिह्यातील शिवसैनिकांचा सत्कार अाहे.असे त्यानी म्हटले आहे.










