परिसरात भितीचे वातावरण.
सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली.
गडचिरोली:- गडचिरोली वनवृत अंतर्गत येत असलेल्या भामरागड वनविभागातील दोन वनरक्षकांना दि. ११ जानेवारी रोजी अती दुर्गम असलेल्या नारगुंडा या गावालगतच्या जंगल परिसरात नेऊन नक्षल्यांनी मारहाण केल्याची घटना 12 जानेवारीच्या सकाळी समोर आली आहे. यात जखमी झालेल्या वनरक्षकांना रात्री 1.00 वाजताच्या सुमारास आलापल्ली येथे आणण्यात आले असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून शासकीय निवास्थानात ठेवण्यात आले आहे.सविस्तर असे कि, भामरागड वनविभागातील एटापल्ली तालुक्यात येत असलेल्या जांभीया- गट्टा वनपरिक्षेत्रातील नेलगुंडा क्षेत्रात वनतलावाच्या जागेच्या कामकाजाकरिता गेले असता नारगुडाचे वनरक्षक जागेश्वर चुलगाय आणी विसामोंडीचे वनरक्षक हुकेश्वर राऊत यांनी आपले काम आटोपून परत येत असतांना विसामोंडी नाल्याजवळ शस्ञधारी नक्षल्यांनी त्यांना अडविले.व तुम्ही कोण, या रस्त्याने कसे आले.असे अनेक प्रश्न विचारत जंगलात नेवुन झाडाला बांधले व बेदम मारहाण केले.या प्रकरणी भामरागड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

