सलीम शेख
तालुका प्रतिनिधी एटापल्ली
अहिरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रभारी सुभाष घुटे यांचे कडे होते पण पदाचा दुरुपयोग व मनमानी कारभारामुळे सुभाष घुटे यांना प्रभारी पदावरून निष्कासित करून पदावरून हटविण्यात आले. त्यासंबंधी बुधवार 12 जानेवारी २०२२ रोजी आलापल्ली च्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख किशोर पोतदार यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक घेऊन तसा ठराव निर्णय घेण्यात आले यावेळी शिवसेनेचे जिल्हा संपर्क कार्यप्रमुख विलास कोडाप अहेरी विधानसभा जिल्हाप्रमुख रियाज शेख जिल्हा संघटक विलास ठोंबरे अहेरी विधानसभा उपजिल्हाप्रमुख अरुण धुर्वे अहेरी ग्रामीणचे उपजिल्हाप्रमुख युवासेनेचे जिल्हाधिकारी प्रभारी सुरपाम युवा सेना अहेरी विधानसभा जिल्हाधिकारी सुरजाताई तलांडे एटापल्ली तालुकाप्रमुख मनीष दुर्गे मुलचेरा तालुका प्रमुख गौरव बाला अहेरी तालुका प्रमुख (शहर) प्रफुल येरणे महिला आघाडी उपजिल्हा संघटिका पौर्णिमा व शिवसेनेचे विधानसभेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते बैठकीत नुकत्याच पार पडलेल्या नगरपंचायत निवडणुकीत सुभाष घुटे हे शिवसेना पक्षाचे प्रचारादरम्यान मनमानी कारभार केले असून स्वयंघोषित अपने स्वतःची पण तयार करून वेगवेगळ्या पदावर कार्यरत असल्याचे भासविले ते वरिष्ठांपर्यंत माहिती पोहोचल्याने त्यांना तात्काळ पदावरून हटविण्याची निर्णय बैठकीत घेण्यात आले तसेच सुभाष घुटे आहे स्वतःला पक्षाचे निरीक्षक जिल्हाप्रमुख असल्याचे मिरवीत होते आणि वेगवेगळ्या शासकीय कार्यालयात जाऊन अधिकारी व कर्मचार्यांना वेठीस धरणे आणि शासकीय कामात व्यत्यय आणण्याचा प्रकार करण्याचे निदर्शनास आले असून पक्षाची संभाव्य बदनामी रोखण्यासाठी सुभाष घुटे यांना प्रभारी पदावरून निष्कासित करून लवकरच शिवसेनेचे तालुकाप्रमुख यांची निवड करण्यात येणार असल्याचेही बैठकीत तसा निर्णय घेण्यात आला यापुढे सुभाष घुटे हे कोणत्याही शासकीय कार्यालयात व जनसामान्यात पदाचा दुरुपयोग केल्यास पक्षाकडून कठोर पाऊल उचलण्यात येईल असाही निर्णय घेण्यात आला











