ग्रामीण भागातील नागरिकामध्ये आनंदाचे वातावरण.
सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली.
गडचिरोली : सुप्रीम कोर्टाने महत्वाचा निर्णय देत बैल गाडा शर्यतीवरील बंदी उठविली आहे.राज्यात बैल गाडा शर्यतीला सशर्त परवानगी देण्यात आली आहे. या निर्णया मुळे राज्यातील बैल गाडा मालकांना मोठा दिलासा मिळाला लेला आहे.2017 साली मुंबई हाय कोर्टात बैल गाडा शर्यतीवर बंदी घालण्यात आली होती.याला राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.आता या शर्यतींना सशर्त परवानगी देण्यात आली आहे.सात वर्षा नंतर या निर्णयामुळे बैल गाडा शर्यत पुन्हा नव्या जोमाने राज्यात सुरू होणार आहे.या निर्णयामुळे राज्यातील बैल गाडा मालकांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.वास्तविक पाहता बैल गाडा शर्यतीचा इतिहास फार जुना आहे.या मागे जवळपास दोनशे ते तीनशे वर्षाचा इतिहास आहे.पूर्व विदर्भातील गडचिरोली,चंद्रपूर,भंडारा,गोंदिया हे जिल्हे धान उत्पादक जिल्हे म्हणून सर्वत्र ओळखले जातात.साधारणतः ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्याच्या दरम्यान धान उत्पादक शेतकऱ्यांचे धानाचे उत्पादन होत असून शेतीचा हंगाम संपल्यामुळे आणि शेतकऱ्यांजवळ धान विक्री तुन थोडी आर्थिक आवक आल्यामुळे शेतकरी कुटुंबात अगदी आनंदाचे वातावरण असते.या निमित्ताने शेतकरी वेगवेगळ्या ग्राम देवतांच्या यात्रा, जत्रा भरवीत असतो.या निमित्ताने ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर शंकर पटाचे आयोजन केले जाते.पशुपालक शेतकऱ्यांसह समाजातील सर्व स्तरातील लोकांना या बैल गाडा किंवा शंकर पट शर्यती आकर्षित करीत आल्या आहेत. गावातील सर्व व्यक्तींनी एकत्रित येऊन आनंद उपभोगावा हा या मागचा मुख्य उद्देश असतो.ग्रामीण भागातील लोकांसाठी सुद्धा प्रतिष्ठतेचा आणि नावलौकिक वाढविणारा हा एक प्रकारचा उत्सव असतो.पशुपालक स्पर्धक त्यांनी अतिशय प्रामाणिक पणे जोपासलेली आपली खिल्लारी बैल या शंकर पटा च्या निमित्ताने स्पर्धेत उतरवीत असतात, जे बैल या पटात जिंकतात त्यांना रोख व आकर्षक वस्तू स्वरूपात बक्षीस देऊन शेतकऱ्यांचा सन्मान केला जातो.शंकर पट शर्यतीच्या आयोजनामागे ग्रामीण अर्थ कारनाचा देखील एक पैलू आहे.या शंकर पटा साठी देसाईगंज तालुक्यातील कोकडी,विसोरा,कुरुड,गडचिरोली,साकोली,पिंपळगाव,लाखनी,मोकाकीनी, लाखांदूर तर नागभीड तालुक्यातील मसली ही गावे प्रसिद्ध आहेत.शंकर पट शौकीनानी त्यांच्या बैलांची नावे ही खूपच मनोरंजक ठेवलेली आहे,यात कोकडी येथील मोहम्मद जमाल अब्दुल गणी शेख यांचा बॉंग्या, तर मंगर मेंढा येथील मधु पाटील यांचा जयराम पुऱ्या,लक्ष्मण पुऱ्या व करिष्मा,सरंडी येथील बुराडे पाटील यांचा पाखरू,गडचिरोली येथील वाघरे यांचा सर्जा मर्जा,डुकऱ्या जहऱ्या ही नावे अगदी मनोरंजक असली तरी नामांकित समजली जातात.
शंकर पट आयोजनात सामाजिक व्यक्ती सोबतच अनेक राजकीय व्यक्तींना सुद्धा छंद लागले असल्याचे दिसून येते यात जगत पाटील रहांगडाले, माजी आमदार नाना शाम कुळे,आरमोरी येथील ठाकरे दफेडार,मधू पाटील मंगर,गडचिरोली येथील वाघरे,यांचा आवर्जून सहभाग राहिलेला आहे.शंकर पटाचे शौकीन असलेले मोहम्मद आसिफ अब्दुल गणी शेख यांनी सांगितले की,शंकर पटा च्या बैलांची काळजी अगदी लहान मुलांसारखी घ्यावी लागते. त्यांना पिठा मध्ये तूप,काजू ,किसमिस,अंडे व कडबा खाऊ घालावा लागतो.त्यांना दोन वेळा आंघोळ घालून कुस्ती तील पैलवानां प्रमाणे तेलाने मालीश करावी लागते धावपटू प्रमाणे दररोज पटाच्या दानिवर त्यांच्या कडून धावण्याचा सराव करून घ्यावा लागतो.शंकर पटा च्या आयोजना मागे सामाजिक बांधिलकी चा ही उद्देश असतो.शंकर पटा निमित्त ग्रामीण भागात विविध नाट्य प्रयोगाचे आयोजन केले जाते.अगदी दिवाळी च्या सना प्रमाणे आपापली घरे सजविण्यात येते प्रत्येक जण आपापल्या नातेवाईकणा आपल्या गावात येण्याची आग्रहाची विनंती करतो आणि या निमित्ताने उप वर वधू ची लग्ने ही जुळविली जातात.