महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती : विद्यार्थी हाच देशाचे उज्ज्वल भविष्य आहे असे प्रतिपादन केंद्रीय मानवाधिकार संघठन नवी दिल्लीचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष तथा एन थिलक कराटे स्कुल इंटरनॅशनल चंद्रपूर चे जिल्हा संघटक डॉ.अंकुश आगलावे यांनी केले.ते येथील मुर्लीधर पाटील गुंडावार मंगल कार्यालयात फिजिकल एज्युकेशन फाऊंडेशन ऑफ चंद्रपूर डिस्ट्रिकच्या वतीने आयोजित एरोबिक्स जिम्नास्टिक ॲन्ड फिटनेस एरोबिक्स टेनिंस कॅम्प च्या समारोपिय कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाला संबोधित करतांना त्यांनी गुरूजिनी घ्यावे ऐसे धडे, आपला आदर्श घेवूनी पुढे, विद्यार्थी तयार होतील चहुकडे, राष्ट्र होईल तेजस्वी ही राष्ट्रसंताची म्हण आजच्या युवा पिढीला घडविणारी असून विद्यार्थी हाच देशाचा उज्ज्वल भविष्य आहे, विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन व संस्कार देवून उत्तम नागरीक घडविणे हे शिक्षकाचे कर्तव्यच आहे. तसेच भद्रावती नगरीतल्या खेळांडूनी जगात नांव लौकीक करावे असे मार्गदर्शनपर विचार डॉ. आगलावे यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले. दोन दिवसीय एरोबिक्स जिम्नास्टिक ॲन्ड फिटनेस एरोबिक्स शिबीरात १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यात प्रा.मकरंद जोशी व प्रा. डॉ. उमेश राठी
यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. प्रा. दुष्यंत नगराळे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून ठाणेदार गोपाल भारती, स्नेहा गणवीर, छाया दास, वर्षा धानोरकर, ज्योती दास, अल्काताई मोटघरे, सरिता मालु, बंडू देरकर, दामोदर दोहतरे, दिलीप मोडक उपस्थित होते. शिबीराचे आयोजन दुर्गराज एन. रामटेके व प्रा. डॉ. संघपाल नारनवरे यांनी केले.