सचिन संघई जिल्हा प्रतिनिधी वाशिम
अनसिंग : अज्ञात दरोडेखोरांनी गोळीबार व धारदार शस्त्राने केलेल्या हल्यात मालेगाव येथील सराफा व्यावसायिक योगेश अंजनकर हे गंभीर जखमी झाले असून त्यांचा सहकारी रवी वाळेकर यांचा वाशिम येथे उपचारा करिता नेत असताना मृत्यू झाला या घटनेचा निषेध व्यक्त करत वाशिम जिल्हा सराफा असोसिएशन अध्यक्ष यांचे वतीने संपूर्ण जिल्ह्यात सराफा व्यावसायिकांनी दी.२२/१२/२०२१ रोजी आपले प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे आवाहन केले होते दि.२२/१२/२०२१ रोजी अनसिंग येथील सर्व सराफा व्यावसायिकांनी आपआपली प्रतिष्ठाने बंद ठेऊन आपला निषेध व्यक्त केला तसेच सदर गुन्ह्यात आरोपी अज्ञात दरोडेखोरांना तात्काळ अटक करावी अशी मागणी सराफा व्यावसायिकांनी केली आहे