आमदार कृष्णा गजबे यांच्या तारांकीत प्रश्नाला रोजगार हमी योजना मंत्र्यांचे सकारात्मक लेखी उत्तर
सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली.
गडचिरोली : मुंबई येथे दि.22 डिसेंबर पासून हिवाळी अधिवेशनाला सुरूवात झालेली असुन या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आमदार कृष्णा गजबे यांनी संपुर्ण गडचिरोली जिल्ह्यातील थडक सिंचन विहीर योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना विहीरींचे बांधकाम पूर्ण करुनही त्यांचे अनुदान थकीत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आणून दिले.शासनाने शेतकऱ्यांना तातडीने निधी उपलब्ध करून देण्याबाबत तारांकीत प्रश्न उपस्थित केला असता रोजगार हमी योजना मंत्री संदिपानराव भुमरे यांनी सकारात्मक लेखी उत्तरात 4 कोटी 25 लक्ष रुपयांचा निधी थकीत असल्याचे मान्य केले व मागील २ वर्षांपासून थकीत असलेला निधी माहे जानेवारी महिन्यात उपलब्ध करून देण्यात येईल.असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील धडक सिंचन विहीर योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या असून, शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न विधानसभेत उपस्थित केल्याबद्दल गडचिरोली जिल्हातील अडचणीत असलेल्या शेतकरी बांधवांनी आमदार कृष्णा गजबे यांचे आभार व्यक्त केले.


