सचिन संघई जिल्हा प्रतिनिधी वाशिम
वाशिम : समाजात आज प्रामाणिकपणा नामशेष होत असून स्वार्थीपणा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अशा परिस्थितीतही बुलढाणा अर्बन शाखा रिठद येथील कर्मचाऱ्यांनी शाखेत सापडलेल्या सोन्याच्या बाळ्या ग्राहकास परत करून प्रामाणिकपणा जिवंत असल्याचा आदर्श समाजापुढे घालून दिला आहे. शाखा रीठद येथे लॉकर सुविधा असल्यामुळे शाखेचे खातेदार अर्जुन जयराम आरू लॉकर ऑपरेट करण्याकरिता शाखेत आले लॉकर ऑपरेट केल्यानंतर अनावधानाने त्यांची मौल्यवान वस्तू सोन्याच्या बाळ्या लॉकरच्या वरच्या बाजूस विसरून राहिल्या दरम्यान संध्याकाळी शाखा बंद करतेवेळेस रोखपाल राम हिंमतराव देशमुख यांनी लॉकर व्यवस्थित बंद आहे का हे पाहण्यासाठी गेले असता सदर मौल्यवान वस्तू त्यांना आढळली. त्यांनी ती वस्तु शाखा व्यवस्थापक गजानन सरकटे यांच्याकडे सुपूर्त केली. शाखा व्यवस्थापक यांनी शहानिशा करून सदर वस्तू खातेदार अर्जुन जयराम आरु यांचीच असल्याची खात्री करून त्यांना ती शाखा कार्यालयात बोलावून त्यांच्याकडे सुपूर्द केली. रोखपाल राम देशमुख यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणाचे सर्वच क्षेत्रातून कौतुक होत आहे.











