सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली.
गडचिरोली : पोलीस अधीक्षक अंकित गोयल,अप्पर पोलीस अधीक्षक सोमय मुंढे, अप्पर पोलीस अधीक्षक अनुज तारे,अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख,यांच्या संकल्पनेतून उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभाग अहेरी मधील नागरिकांकडे असणारी वडिलोपर्जीत,शिकारी करीता वापरली जाणारी आधुनिक शस्त्रे प्रत्येक स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये स्वइच्छेने जमा करण्याचे आवाहन केले होते. सदर आवाहनाला पेरमिली परिसरातील नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद देत दि.8 डिसेंबर रोजी उप पोलीस स्टेशन पेरमिली येथे अहेरी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांचे समक्ष 2 भरमार बंदुका व 2 बॅरेल आणून जमा केले. सदर कार्यवाहिकरिता प्रभारी अधिकारी धवल देशमुख,पोलीस उपनिरिक्षक गंगाधर जाधव,पोलीस उपनिरिक्षक धनंजय पाटील,पोलीस नाईक मनोज कुनघाटकर,पोलीस शिपाई सुरज करपेत यांनी प्रयत्न केले.नागरिकांनी पोलीस दलाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिल्याबाबत नागरिकांचा उप पोलीस स्टेशन पेरमिली येथे सत्कार करण्यात आला.सदर कार्यक्रमाला सिआरपीएपचे कामांडन्ट बाळापूरकर,पीआय दास उपस्थित होते.तसेच यांनतर सुद्धा नागरिकांनी आपल्या जवळ असलेल्या भरमार बंदुका किंवा इतर शस्त्रे जास्तीत जास्त प्रमाणात जमा करण्याचे आवाहन पेरमिली पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.