किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
अकोला : तामिळनाडूतील कन्नड मध्ये सी डी एस जनरल बिपिन रावत त्यांच्या पत्नी सह एकूण 13 जवानांचा हेलिकाॅप्टर दुर्घटनेत दुःखद निधन झाल्याने संपूर्ण देशाला एक मोठा हादरा बसला आहे. गेल्या दोन दिवसापासून देशात या झालेल्या जवानांच्या अनपेक्षित दुर्दैवी करून अंताने प्रत्येक देशवासी दुःखात डुबलेला आहे. त्यांच्या विषयी भावनावश होऊन अनेक संघटनांनी आपापल्या परिसरामध्ये सी डी एस जनरल बिपिन रावत व त्यांच्या सहकाऱ्यांना श्रद्धांजली व मानवंदना देवून अखेर चा निरोप पातूर येथील माजी सैनिक संघटना,स्थानिक नागरिक गुरुदेव सेवा मंडळाचे तिमांडे महाराज यांच्या सह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी गुरूवार पेठ जवळ शहिद आनंदा काळपांडे यांच्या स्मारकाच्या ठिकाणी दिला आहे. मनोगतात माजी सैनिक संघटना तालुका शाखा पातूर चे अध्यक्ष तुकाराम निलखन म्हणाले सी डी एस जनरल विपिन रावत यांच्या काळात चीन च्या चीनी सैनिकांना सिमेवरून खदेडण्याचे साहसी काम भारतीय सैनिक करू शकला, पाकिस्तावर सर्जिकल स्ट्राईक करून वठणीवर आणण्यासाठी मोलाची व महत्वाची भूमिका बजावली,त्यांच्या पाठपुराव्यातुन वन रॅन्क वन पेन्शन योजना लागू करण्यात आली असे देशाच्या व देशाचे संरक्षण करणा-या सैनिकांच्या कायम स्मरणात राहतील असे कार्य जनरल रावत यांचे होते असे मत व्यक्त केले.भास्कर कळाशीकर आणी अंबादास टप्पे यांनी ही आपल्या मनोगतातून त्यांच्या कार्या विषयी अनेक गोष्टींना उजाळा दिला.त्यावेळी सर्वांना अश्रु अनावर झाले.त्यांच्या सन्मानात शहिद विपिन रावत अमर रहे अमर रहे अशा घोषणा देत त्यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष देविदास निमकंडे, सचिव प्रशांत निलखन, कोषाध्यक्ष अंबादास टप्पे, महादेव परमाळे, भिमराव घायाळकर, अरूण राऊत, दिपक गाडगे, सैनिक पिता दिलीपसिंह ठाकूर, ज्येष्ठ नागरिक भास्कर कळाशीकर,डाँ.मदन नालींदे, सुरेश पैठणकर, श्रीकूष्ण दूरळकर, मोहंम्मद नशीम, रामकूष्ण बगाडे, बाबासाहेब सरनाईक,ह.भ.प.रामराव तिमांडे महाराज,प्रल्हाद नायगावकर, राजराम येनकर, जेष्ठ पत्रकार देवानंद गहीले, गजानन बारताशे, पांडूरंग सातव, ईत्यादी उपस्थित होते.











