सचिन संघई जिल्हा प्रतिनिधी वाशिम
वाशिम : मागील वर्षी कोरोनाची दुसरी लाट देशात आल्याने अनेक नागरिकांना कोरोनाची लागण झाली होती त्यात अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागले होते.सध्या देशात ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून या पार्श्वभूमीवर वाशीम जिल्हा प्रशासना कडून लसीचे 2 डोस न घेणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाईची धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे. आता पर्यंत या मोहीमे अंतर्गत ठिकठिकाणी अनेकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या मोहिमअंतर्गत लसीचे दोन्ही डोज घेल्याची ई- पास ज्या वाहनधारका जवळ नसल्यास अश्या वाहनधारकांवर कडक कार्यवाही करण्यात येत आहे.जिल्ह्यात ही मोहीम पोलीस,महसूल व नगर पालिका प्रशासना कडून संयुक्तपणे राबविण्यात येत असून रस्त्यावर ठिकठिकाणी वाहनांना अडविण्यात येऊन लस न घेतलेल्या नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे