किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातुर : शिर्ला (अंधारे) येथील श्री सोमपुरी महाराज ज्येष्ठ नागरिक संघानेआयोजित केलेल्या ज्येष्ठांचे आरोग्य’ या विषयावर डॉ. शरद कोकाटे उपाध्यक्ष इंडियन डेंटल असोसिएशन मुंबई हे बोलत होते. ज्येष्ठांनी प्रथम प्राधान्य आपल्या आरोग्याला द्यावे आरोग्याकरिता योग प्राणायामाला दुसरा पर्यायच नाही. सकाळी नियमित योग प्राणायाम आणि सोबत सूक्ष्म व्यायाम करावा. कोवळे उन अंगावर घेत पेपर वाचावा छंद जोपसावा म्हणजे चित्तही शांत राहील. प्राप्त झालेले बोनस आयुष्य आनंदाने जगुन समाजासाठी काहीतरी करावे.नियमित वाचन करावे माझ्या ग्रंथ संग्रहातील पुस्तकांची आपल्या ज्येष्ठ नागरिक संघाचे वाचनालयाला भेट देण्याचा मला आनंद होतो आहे. तरुणांनी आणि ज्येष्ठांनी वाचन संस्कृती जोपासावी रामायणाचार्य महादेव महाराज निमकंडे यांनी ज्येष्ठ नागरिक संघाचे विविध उपक्रमांची माहिती दिली व डॉ. शरद कोकाटेंची कर्मभूमी मुंबई असली तरी या सोमपुरींच्या पावन भूमीशी त्यांची नाळ अजुनळी जुळलेली आहे असे सांगितले.ह.भ.प राजू महाराज कोकाटे यांनी या प्रसंगी मनोगत व्यक्त केले. अध्यक्ष नारायण अंधारे यांनी आपला कैवल्याचे लेणे हा कवितासंग्रह त्यांना भेट दिला. कार्यक्रमाला वीरपिता काशीराम निमकंडे, कृषी समिती अध्यक्ष सुहास कोकाटे, निळकंठ अंधारे, दामोदर अंधारे, रामकृष्ण खंडारे, मेजर इंगळे, विनायक निलखन, स्वप्निल कोकाटे, गजानन भाजीपाले, देविदास निमकंडे, गजानन अंधारे, रामचंद्र बळकार, अमोल अंधारे,आदित्य अंधारे आणि ग्रामस्थांची उपस्थिती होती.